शालेय विद्यार्थ्यांनी दिला वन्यजीव रक्षणाचा संदेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 02:51 PM2017-10-02T14:51:21+5:302017-10-02T14:54:18+5:30

School girl warns of wildlife protection! | शालेय विद्यार्थ्यांनी दिला वन्यजीव रक्षणाचा संदेश!

शालेय विद्यार्थ्यांनी दिला वन्यजीव रक्षणाचा संदेश!

googlenewsNext
ठळक मुद्देवनविभागाचा उपक्रम वन्यजीव सप्ताहनिमित्त जनजागृती रॅली


अकोला : वन्यजीव सप्ताहनिमित्त अकोला वनविभागाद्वारे सोमवारी शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये सहभागी शालेय विद्यार्थी व वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी फलक व घोषवाक्यांमधून वन्यजीवांचे रक्षण करण्याचा संदेश दिला.
वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरातून प्रारंभ झालेली ही रॅली धिंग्रा चौक, टॉवर चौक, अग्रसेन चौक अशी मार्गक्रमना करीत उपवनसंरक्षक कार्यालयात पोहचली. रॅलीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), न्यू ईरा हायस्कुलचे विद्यार्थी व शिक्षकवृंद सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषवाक्यांद्वारे वन्यजीव संरक्षणाचा संदेश दिला. रॅलीमध्ये उपवनसंरक्षक पी.जे. लोणकर, विभागीय वन अधिकारी विजय माने, खैरनार, प्राचार्य प्रमोद भंडारे, मुख्याध्यापिका मिना रेलकर, ठाकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी , सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश गिते, शेख महमुद शेख मकबुल, देवेंद्र तळेकर, उदय वझे, मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, वनपाल बावणे, वन्यजीव अभ्यासक गोविंद पांडे उपस्थित होते. रॅलीमध्ये पियुष शेराबली, आकाश रेड्डी, दिपक तायडे, दिपक दांडेकर या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे अस्वल, ससा, वाघ व जिराफ या वन्यप्राण्यांची वेशभूषा धारण केली होती.

 

Web Title: School girl warns of wildlife protection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.