हातरुणच्या १३० विद्यार्थिनींनी पाठविल्या सैनिकांना राख्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 03:25 PM2018-08-11T15:25:42+5:302018-08-11T15:28:26+5:30
हातरुण ( जि. अकोला ) : भाऊ-बहिणीच्या नात्याचा पवित्र असलेला रक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवर असताना महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थिनींनी 'एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमात सहभागी होऊन देशाच्या सीमेवर संरक्षणासाठी तैनात असणाऱ्या सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
- संतोष गव्हाळे
हातरुण ( जि. अकोला ) : भाऊ-बहिणीच्या नात्याचा पवित्र असलेला रक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवर असताना महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थिनींनी 'एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमात सहभागी होऊन देशाच्या सीमेवर संरक्षणासाठी तैनात असणाऱ्या सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
हातरून येथील महात्मा गांधी विद्यालयात 'एक राखी सैनिकांसाठी' या उपक्रमात १३० विद्यार्थिनींनी सहभागी होऊन पोस्टकार्डवर आपल्या सैनिक भावाला संदेश पाठवला. शुक्रवारी दुपारी हा सामाजिक बांधिलकी जोपासणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक नरहरी बोरसे होते. यावेळी अमृत पवार, प्रा. रवी हेलगे, सुनील जाधव, कौशिक पाठक, जयपाल घोती, रमेश फुंडकर प्रामुख्याने उपस्थित होते. सैनिकांचे शौर्य, देशप्रेम आणि देशभक्ती विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे गरजेचे आहे. एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम देशभक्ती आणि बंधुत्वाचा संदेश देणारा ठरणार असल्याचे विचार मुख्याध्यापक नरहरी बोरसे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी रक्षाबंधनाला पाठवलेली राखी हे बहीण भावाचे 'बंधुत्वाचं नातं' दृढ करेल असा विश्वास पोस्टकार्डद्वारे संदेश लिहतांना विद्यार्थिनींनी व्यक्त केला. महात्मा गांधी विद्यालयातील १३० विद्यार्थिनींनी पोस्टकार्ड लिहून पाठवलेल्या राखीचा स्वीकार करण्याची सैनिक भावाला विनवणी केली. देशभक्ती आणि बंधुत्वाचा संदेश देणारा हा उपक्रम अमृत पवार, प्रा. रवी हेलगे, कौशिक पाठक, सुनील जाधव, जयपाल घोती यांच्या प्रयत्नामुळे साकारला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी सीमेवर कार्यरत सैनिकांचे योगदान देशासाठी अत्यंत महत्वाचे असल्याच्या भावना सैनिक बांधवांना पोस्टकार्डद्वारे लिहून व्यक्त केल्या. ११ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. अकोलाचे अँडम ऑफीसर कर्नल शहा रोहित व्ही. यांच्याकडे मुख्याध्यापक नरहरी बोरसे, अमृत पवार, प्रदीप भडंग यांनी या सर्व राख्या आणि पोस्टकार्ड संदेशाचा बॉक्स सुपूर्द केला. कार्यक्रमाला शालिग्राम डिवरे, रमेश फुंडकर, प्रदीप भडंग, प्रा.रवी हेलगे, हिरामण चव्हाण,जयपाल घोती, अमृत पवार, कौशिक पाठक, सुनील जाधव, पांडुरंग चोपडे, हरिदास गोरे, श्रीपाद चोपडे, गजानन माहोकार, गजानन ठाकरे, रामदास कोगदे, विलास नागळे, सिद्धार्थ डोंगरे, राजेश फोकमारे, संतोष गव्हाळे उपस्थित होते.
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना श्रद्धांजली!
दहशतवाद्यांविरोधात लढताना शहीद झालेले २९ वर्षीय मेजर कौस्तुभ राणे यांना महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षकवृंद आणि शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी श्रद्धांजली वाहिली.
देशाच्या सीमेवर प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या सैनिकांप्रति प्रत्येकच भारतीय नागरिकांच्या मनात कृतज्ञतेचा भाव असतो. रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली. "एक राखी सैनिकांसाठी" या उपक्रमात विद्यार्थिनींनी घेतलेला सहभाग महत्वपूर्ण आहे.
- अमृत पवार, शिक्षक, म.गांधी. विद्यालय, हातरुण.