शालेय पाेषण आहाराचा फज्जा; घरपाेच पुरवठा नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:19 AM2021-02-16T04:19:56+5:302021-02-16T04:19:56+5:30
जिल्हा परिषद, महापालिका-नगरपालिकांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी निविदा प्रक्रिया रावबून महिला बचत गटांना शालेय पाेषण आहार पुरवठ्याचे कंत्राट दिले जात ...
जिल्हा परिषद, महापालिका-नगरपालिकांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी निविदा प्रक्रिया रावबून महिला बचत गटांना शालेय पाेषण आहार पुरवठ्याचे कंत्राट दिले जात होते. २०१९-२० या शालेय वर्षात पाेषण आहाराचा केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत पुरवठा करण्याचा आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिला हाेता. सुरुवातीला शासन स्तरावर नियुक्त केलेल्या संस्थेच्यावतीने आहाराचा पुरवठा केला जाणार होता. ही प्रक्रिया थंडबस्त्यात सापडल्यामुळे शिक्षण विभागाने स्वायत्त संस्थांच्या स्तरावर निविदा प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने स्वायत्त संस्थांनी स्थानिक पातळीवरील एजन्सी व पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांच्या निविदा मंजूर करून त्यांना कार्यादेश दिले. २०२०-२०२१ या चालू शैक्षणिक सत्रापासून या प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा पुरवठा सुरू होण्यापूर्वीच २३ मार्च २०२० पासून टाळेबंदी लागू झाली. त्यामुळे आहार वाटपाचा तिढा निर्माण झाला. ही बाब ध्यानात घेता, शासनाने विद्यार्थ्यांना आहाराचा ‘पॅकिंग’द्वारे तसेच घरपाेच पुरवठा करण्याचे निर्देश जारी केले हाेते.
घरपाेच पुरवठा नाहीच!
टाळेबंदीच्या कालावधीत मार्च ते एप्रिल महिन्यांत विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे शासनाने तांदळाच्या व्यतिरिक्त मूग व हरबरा डाळीचे ‘पॅकिंग’ करून विद्यार्थ्यांना घरपाेच पुरवठा करण्याचे निर्देश दिले हाेते. सद्य:स्थितीत इयत्ता पहिली ते चाैथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा बंदच आहे. अशा विद्यार्थ्यांना आहाराचा घरपाेच पुरवठा हाेत नसल्याचे समाेर आले आहे.