विद्यार्थ्यांसाठी आता ‘शाळाबाहेरची शाळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 04:55 PM2020-05-05T16:55:35+5:302020-05-05T16:55:41+5:30
विद्यार्थ्यांसाठी मोबाइल अॅपद्वारे ‘शाळाबाहेरची शाळा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
अकोला : लॉकडाउनच्या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी मोबाइल अॅपद्वारे ‘शाळाबाहेरचीशाळा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दर मंगळवार आणि शुक्रवारी रेडिओ चॅनेलवरून हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रसारित केला जाणार आहे. त्यामध्ये शिक्षक, पालक, अंगणवाडीसेविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी केले आहे.
अंगणवाडी ते इयत्ता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम नागपूर आकाशवाणी केंद्राने सुरू केला आहे. पालकांकडे असलेल्या मोबाइलद्वारे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना ऐकवता येणार आहे. तसेच स्मार्ट मोबाइल असलेल्या पालकांना अॅपद्वारेही हा कार्यक्रम मुलांसाठी उपलब्ध राहणार आहे. स्मार्ट मोबाइल असलेले शिक्षक, पालक, अंगणवाडीसेविका यांनी कार्यक्रम मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी अॅप डाउनलोड करावे, तसेच या उपक्रमाची सर्वांना माहिती देऊन सहभागी करावे, असे आवाहनही ठग यांनी केले आहे.