शाळा दुरुस्ती कामांचा प्रस्ताव पाठविणार बांधकाम विभागाकडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:17 AM2021-05-24T04:17:39+5:302021-05-24T04:17:39+5:30
अकोला : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा इमारतींच्या दुरुस्ती कामांचा प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे पाठविण्याचे निर्देश जिल्हा परिषद शिक्षण ...
अकोला : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा इमारतींच्या दुरुस्ती कामांचा प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे पाठविण्याचे निर्देश जिल्हा परिषद शिक्षण समितीने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत. त्यानुषंगाने लवकरच जिल्हा परिषद शाळा इमारतींच्या दुरुस्ती कामांचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारतींच्या दुरुस्ती कामांसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला निधी उपलब्ध झाला आहे. उपलब्ध निधीतून जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा इमारतींच्या दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने नियोजन करून जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या यादीसह शाळा इमारतींच्या दुरुस्ती कामांचा प्रस्ताव तातडीने जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला देण्यात आले. त्यानुसार जिल्हा परिषद शाळा इमारतींच्या दुरुस्ती कामांचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे सादर करण्यात येणार आहे. शाळा दुरुस्तीच्या कामांच्या यादीसह प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत शाळा इमारतींच्या दुरुस्ती कामांची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.