प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी शालेय विद्यार्थी घेणार शपथ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 01:39 AM2017-10-10T01:39:44+5:302017-10-10T01:40:29+5:30

अकोला: दरवर्षी दिवाळी उत्सवामध्ये कोट्यवधी रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी केली जाते. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वातावरणात मोठय़ा प्रमाणात धूर निर्माण  होऊन हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण होते. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यंदापासून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून, शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीचे महत्त्व पटावे, या उद्देशाने मंगळवारी १0 ऑक्टोबर रोजी सकाळी १0.१५ वाजता राज्यातील सर्व शाळांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी शालेय विद्यार्थ्यांना शपथ देण्यात येणार आहे. 

School students to take pollution free Diwali! | प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी शालेय विद्यार्थी घेणार शपथ!

प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी शालेय विद्यार्थी घेणार शपथ!

Next
ठळक मुद्देशिक्षण संचालकांचे शिक्षणाधिकार्‍यांना पत्र शाळांमध्ये उपक्रम घेण्याचा आदेश

नितीन गव्हाळे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: दरवर्षी दिवाळी उत्सवामध्ये कोट्यवधी रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी केली जाते. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वातावरणात मोठय़ा प्रमाणात धूर निर्माण  होऊन हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण होते. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यंदापासून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून, शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीचे महत्त्व पटावे, या उद्देशाने मंगळवारी १0 ऑक्टोबर रोजी सकाळी १0.१५ वाजता राज्यातील सर्व शाळांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी शालेय विद्यार्थ्यांना शपथ देण्यात येणार आहे. 
देशभरामध्ये दिवाळीचा उत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात येतो. दिवाळीमध्ये आवाजी फटाके खरेदी करण्यासाठी मुले आणि युवकांचा अधिक आग्रह असतो. आवाजी व धूरयुक्त फटाक्यांची आतषबाजी केल्यामुळे वातावरणात मोठय़ा प्रमाणात हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण होते. या प्रदूषणामुळे दम्याचे, फुप्फुसाचे, श्‍वसनाचे आजार होतात.  हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण रोखण्यासाठी शालेय स्तरावर जनजागृती करून विद्यार्थ्यांचे आवाजी फटाक्यांची आतषबाजी टाळण्यासाठी मन परिवर्तन व्हावे या उद्देशाने यंदा प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान राबविण्याचा निर्णय पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी शिक्षण विभागाला पत्र पाठवून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येऊन, त्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ देण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय स्तरावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यातून परीक्षार्थी विद्यार्थ्यांना वगळण्यात आले आहे. 
राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकाच वेळी आणि एकत्रितपणे शपथ घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे. राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या आदेशानंतर प्राथमिकचे शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी  शिक्षणाधिकार्‍यांनासुद्धा पत्र पाठवून सर्व शाळांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प अभियान राबविण्याचे आदेश दिले आहेत. 

शाळांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासंदर्भात शालेय विद्यार्थ्यांना मंगळवारी शपथ दिली जाणार आहे. शिक्षण विभागाने सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून उपक्रम घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार जिल्हय़ातील सर्व शाळांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. 
-प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी 
प्राथमिक, जिल्हा परिषद, अकोला

Web Title: School students to take pollution free Diwali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.