यंदा शालेय पाठ्यपुस्तकांचा होणार पुनर्वापर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:17 AM2021-05-01T04:17:14+5:302021-05-01T04:17:14+5:30

अकोला : शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे, या उद्देशाने शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण विषय समाविष्ट केला आहे. पर्यावरण संरक्षणासाठी पुनर्वापराची ...

School textbooks will be reused this year! | यंदा शालेय पाठ्यपुस्तकांचा होणार पुनर्वापर!

यंदा शालेय पाठ्यपुस्तकांचा होणार पुनर्वापर!

Next

अकोला : शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे, या उद्देशाने शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण विषय समाविष्ट केला आहे. पर्यावरण संरक्षणासाठी पुनर्वापराची संकल्पना मुलांना शिकविली जाते. या संकल्पनेचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत देण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा प्रायोगिक तत्त्वावर पुनर्वापर करण्यात येणार आहे. पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांनी वापरलेली पाठ्यपुस्तके पालकांनी शाळेत मुख्याध्यापकांकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समग्र शिक्षा योजनेतर्गंत इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. त्यासाठी दरवर्षी २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च या पाठ्यपुस्तकांवर होतो. शालेय विद्यार्थ्यांना गतवर्षी वाटप करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकांपैकी अनेक विद्यार्थी पाठ्यपुस्तके योग्य रीतीने सांभाळून व सुव्यवस्थित ठेवतात. अधिकाधिक विद्यार्थ्यांकडून मुख्याध्यापकांनी पाठ्यपुस्तकांचे संकलन करून त्याचे पुढील वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना फेरवाटप करावे. पुस्तकांचा पुनर्वापर केल्यामुळे काही प्रमाणात कागदाची बचत होईल आणि पर्यावरणाची हानी होणार नाही. गतवर्षीपासून शासनाने पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापराचा प्रकल्प सुरू केला आहे. ज्या शाळांमध्ये मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात त्या शाळांमधील विद्यार्थी व पालकांनी २०१९-२० आणि २०२०-२०२१ मध्ये वापरलेली पाठ्यपुस्तके शाळेतील मुख्याध्यापकांकडे जमा करावी. पाठ्यपुस्तके जमा झाल्यानंतर पुस्तकांची वर्गवारी शाळास्तरावर करण्यात येणार आहे.

एकूण शाळा- १,४८८

एकूण विद्यार्थी- १,५७,१९८

गतवर्षी विद्यार्थ्यांना दिलेली पाठ्यपुस्तके

इ. १ ली- १५,४४३

इ. २ री- १६,२५३

इ. ३ री- १७,४८७

इ. ४ थी- १९,०८३

इ. ५ वी- २१,४३०

इ. ६ वी- २१,७४७

इ. ७ वी- २२,०५१

इ. ८ वी- २२,७०४

पर्यावरण संवर्धन आणि कागदाची बचत करण्याच्या दृष्टीने गतवर्षी दिलेल्या पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. विद्यार्थी व पालकांनी वापरलेली पुस्तके मुख्याध्यापक, शिक्षकांकडे आणून द्यावी व पर्यावरण संवर्धनात सहभाग द्यावा.

-डॉ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी प्राथमिक

पुस्तकांच्या पुनर्वापराबद्दल जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांची आढावा सभा घेण्यात आली. त्यात ठरल्यानुसार विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके संकलित करून पुनर्वापर प्रकल्पास हातभार लावावा. पालकांनीसुद्धा पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या पाल्याने वापरलेली पुस्तके इतर विद्यार्थ्यांच्या कामी पडतील. यासाठी सहकार्य करावे.

- नंदकिशोर लहाने, सहायक कार्यक्रम अधिकारी, समग्र शिक्षा अभियान

Web Title: School textbooks will be reused this year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.