दुर्गम भागातील शाळा होतील ‘हायटेक’!

By admin | Published: September 21, 2016 02:13 AM2016-09-21T02:13:10+5:302016-09-21T02:13:10+5:30

रोटरी क्लबचा पुढाकार; लोकवर्गणीतून डिजिटल क्लासरूम.

Schools in remote areas will be 'hi tech'! | दुर्गम भागातील शाळा होतील ‘हायटेक’!

दुर्गम भागातील शाळा होतील ‘हायटेक’!

Next

संतोष वानखडे
वाशिम, दि. २0 - ग्रामीण भागातील दुर्गम परिसरात वसलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून हायटेक करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचा मदतीचा हात मिळणार आहे. वाशिम जिल्हय़ात गतवर्षी लोकवर्गणीतून १२७ शाळांना 'डिजिटल'ची जोड मिळाली असून, यावर्षी रोटरी क्लबनेदेखील १२ शाळांची चाचपणी केली आहे.
खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक दर्जा खालावलेला असतो, अशी ओरड नेहमीच होत आली आहे. हा समज पुसून टाकण्यासाठी जिल्हा परिषदेने लोकसहभागातून शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्याला गतवर्षापासून सुरुवात केली. गतवर्षी १२७ गावांतील पालकांनी लोकवर्गणीतून ह्यडिजिटलह्ण वर्गखोली तयार करून इतरांसमोर आदर्श निर्माण केला.
वाशिम जिल्हय़ात जिल्हा परिषदेच्या ७७३ शाळा असून, नगर परिषद, नवोदय आणि अन्य शासकीय अशा एकूण ५७ शाळा आहेत. दोन्ही मिळून ८३0 शाळा असून, दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांना डिजिटल करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेचे पाऊल पडत आहे. ग्रामस्थ, पालकांच्या लोकवर्गणीतून गतवर्षी जिल्हय़ात १२७ शाळा डिजिटल झाल्या आहेत. यावर्षी रोटरी क्लबने सुरुवातीलाच काही शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुषंगाने अडीच महिन्यांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास पेंदोर यांच्याशी रोटरी क्लबच्या पदाधिकार्‍यांनी चर्चादेखील केली. जिल्हय़ातील दुर्गम भागातील १२ शाळांची चाचपणी करून तसा अहवाल रोटरी क्बलने वरिष्ठांकडे सादर केला आहे. वरिष्ठांची हिरवी झेंडी मिळाल्यानंतर प्राथमिक स्वरूपात या १२ शाळांमध्ये आवश्यक त्या अद्ययावत सुविधा पुरविल्या जातील.
डिजिटल वर्गखोलीच्या माध्यमातून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांंंना अभ्यासाची आवड निर्माण करणे, त्यांच्यात तंत्रज्ञान वापरण्याची आणि विज्ञानाच्या प्रयोगाची माहिती सुलभ व सुकर करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावर्षीदेखील लोकवर्गणीतून जिल्हा परिषदेच्या शाळेत 'डिजिटल क्लासरूम' ही संकल्पना साकारली जाणार आहे.

Web Title: Schools in remote areas will be 'hi tech'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.