विज्ञानमंचची परिक्षा २० आॅगस्टला

By atul.jaiswal | Published: August 18, 2017 01:58 PM2017-08-18T13:58:50+5:302017-08-18T13:58:50+5:30

science forum exam on 20 august | विज्ञानमंचची परिक्षा २० आॅगस्टला

विज्ञानमंचची परिक्षा २० आॅगस्टला

Next



अकोला : विज्ञानमंच ही योजना विज्ञान शिक्षणाची आणि राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची पूर्व तयारी करीता सहाय्यभूत योजना आहे. जिल्ह्यातील विखुरलेले प्रज्ञावंत विद्यार्थी एकत्र करून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृध्दीवंत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर व शिक्षणाधिकारी (माध्य) जिल्हा परिषद अकोला यांच्या विद्यमाने जिल्हा विज्ञानमंच प्रवेश परिक्षेचे आयोजन जिल्ह्यातील ज्युबिली इंग्लीश हायस्कूल रामदारपेठ पोलिस स्टेशन जवळ अकोला आणि बाळापूर, पातूर, बार्शिटाकळी, मूर्तिजापूर तालुके या केंद्रावर तर श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालय अकोट या केंद्रावर तेल्हारा व अकोट तालुक्यातील विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
विज्ञानमंच प्रवेशचाचणी परीक्षेची प्रश्नपत्रीका मराठी व इंग्रजी माध्यमातून राहिल. ही प्रश्नपत्रिका मानसिक क्षमता कसोटी व शालेय प्राविण्यता कसोटी अशा दोन भागात विभागली आहे. यासाठी एकूण २० गुणांचे २० वस्तूनिष्ठ प्रश्न विचारले आहे. शालेय प्राविण्यता कसोटीमध्ये गणितासाठी १५ गुणांचे १५ वस्तुनिष्ठ प्रश्न व सामान्य विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आणि जीवशास्त्र) या विषयावर आधारित ४५ गुणांचे ४५ प्रश्न वस्तूनिष्ठ प्रश्न इंग्रजीसाठी १०गुणांचे १० प्रश्न आणी सामान्य ज्ञान १० गुणांचे १० प्रश्न असे शंभर गुण- शंभर प्रश्न असतील. परिक्षेतून निवडप्राप्त शहरी भागातील ३० आणि ग्रामीण भागातील ४० विद्यार्थी असे एकूण ७० विद्यार्थ्याचे ७ दिवसाचे निवासी निशुल्क प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दिवाळीच्या सुट्टित किं वा दीर्घ सुट्टीत आ़योजित करण्यात येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, देवेंद्र अवचार,दिनेश तरोळे, अरूण शेगांवकर, रविंद्र भास्कर, अनिल जोशी, विश्वास जढाळ, अनिल मसने, सुनिल वावगे, एस.बी.जाधव, गजानन निमकर्डे, व्ही.डी.देवके, विलास, घुंगड यांनी केले आहे.

Web Title: science forum exam on 20 august

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.