विज्ञान मंच प्रशिक्षण शिबिराचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:28 PM2019-03-17T12:28:52+5:302019-03-17T12:29:40+5:30
अकोला: शाळांमध्ये सर्व सुविधा आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानुन त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची गरज आहे. सध्या जिल्ह्याचा शिक्षणस्तर उंचावत असून जिल्ह्यातील चार शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता मिळाली आहे.
अकोला: शाळांमध्ये सर्व सुविधा आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानुन त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची गरज आहे. सध्या जिल्ह्याचा शिक्षणस्तर उंचावत असून जिल्ह्यातील चार शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता मिळाली आहे. ही गौरवाची बाब आहे. असे प्रतिपादन जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव यांनी केले.
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी माध्यमिक, अकोला एज्युकेशन सोसायटीच्यावतीने न्यू इंग्लिश हायस्कूलच्या सभागृहात १४ मार्च रोजी झालेल्या विज्ञान मंच शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. भाऊसाहेब मांडवगणे होते. प्रमुख अतिथी म्हणून स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या प्राचार्य मनिषा उंबरकर, प्राचार्य माधव मुन्शी, प्रा.डॉ. रविंद्र भास्कर, शशीकांत बांगर होते. दोन दिवसीय शिबिरात विज्ञान मंच परीक्षेतून पात्र ठरलेल्या १४0 पैकी १0८, ज्ञान विज्ञान परीक्षेत पात्र ७१ पैकी ४0 विद्यार्थी आणि पालक, शिक्षक अशा एकूण २५८ शिबिरार्थींनी सहभाग घेतला. १३ व १४ मार्च रोजी न्यू इंग्लिश व आरएलटी विज्ञान महाविद्यालयात झालेल्या शिबिरात प्रा. संजय देव्हळे, हेमंत ओझरकर, अमोल सावंत, संदीप वाघळकर, तृप्ती देशपांडे, आशिष गावंडे, ओरा चक्रे, धम्मदीप इंगळे आदींनी वैज्ञानिक विषयांवर मार्गदर्शन केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी विश्वास जढाळ, सुनील वावगे, मुरलीधर थोरात, एस.बी. जाधव, नितीन तिवारी, सचिन ताडे, विजय पजई, पंकज जोशी, आशिष कुळकर्णी, प्रतापसिंह चौहान, संजय जोशी, जयंत जोशी, विलास कुळकर्णी, विशाल लाखपुरे यांनी प्रयत्न केले. संचालन प्राचार्य माधव मुन्शी, किरण चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. रवींद्र भास्कर यांनी मानले. (प्रतिनिधी)