जेसीआयतर्फे विज्ञान पोस्टर मेकिंग स्पर्धा ; विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:19 AM2021-03-16T04:19:54+5:302021-03-16T04:19:54+5:30

स्पर्धा कोविड-१९चे नियम पाळून ऑनलाइन पद्धतीने दोन गटांमध्ये घेण्यात आली होती. त्यामध्ये 'अ' गटामधून प्रथम क्रमांक विनय कमलकिशोर राठी, ...

Science Poster Making Competition by JCI; Student response | जेसीआयतर्फे विज्ञान पोस्टर मेकिंग स्पर्धा ; विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

जेसीआयतर्फे विज्ञान पोस्टर मेकिंग स्पर्धा ; विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

Next

स्पर्धा कोविड-१९चे नियम पाळून ऑनलाइन पद्धतीने दोन गटांमध्ये घेण्यात आली होती.

त्यामध्ये 'अ' गटामधून

प्रथम क्रमांक विनय कमलकिशोर राठी, द्वितीय क्रमांक रिया नितीन हाडोळे तसेच विनोद अग्रवाल याने तृतीय क्रमांक मिळविला. ‘ब’गटामध्ये प्रथम क्रमांक मैथली आनंद बाळे तर द्वितीय क्रमांक अश्विनी निर्मल सिंग तसेच श्रेया बिपिन टावरी हिने तृतीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे नेतृत्व वेदांती आनंद भोरे, प्रकल्प प्रमुख आनंदी अजय अडोकार यांनी केले.

तसेच प्रवीण बनसोड यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे परीक्षण लक्ष्मीबाई गणगणे विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष गजानन निमकर्डे यांनी केले. या स्पर्धेकरिता जेसीआय अकोटचे अध्यक्ष जेसी नितीन शेगोकार, सचिव जेसी सागर बोरोडे, पवन ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी जेसीआय टीमने परिश्रम घेतल्याची माहिती अमित ठाकूर यांनी दिली.

Web Title: Science Poster Making Competition by JCI; Student response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.