कोविड चाचणी अहवाल नसल्यास दुकाने सिल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:18 AM2021-03-19T04:18:13+5:302021-03-19T04:18:13+5:30
या संदर्भात जिल्हा टास्क समितीच्या बैठकीत आज चर्चा झाली. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा, वैद्यकीय महाविद्यालयाचे सह अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर ...
या संदर्भात जिल्हा टास्क समितीच्या बैठकीत आज चर्चा झाली. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा, वैद्यकीय महाविद्यालयाचे सह अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, डॉ.अंभोरे, डॉ.दिनेश नैताम, उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच अन्य संबधित अधिकारी उपस्थित होते.
दुकानांची तपासणी सोमवारपासून
अकोला- जिल्ह्यात सोमवारपासून दुकानांचे तपासण्या सुरु कराव्या. दुकानदारांनी स्वतः व आपले कामगार यांच्या कोविड चाचण्या करणे आवश्यक आहे आणि चाचणी अहवाल निगेटिव्ह असेल तरच दुकान सुरू ठेवावे, असे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत. . आपला अहवाल निगेटिव्ह आल्यास दुकाने सुरू करावीत, अशी अपेक्षा आहे. या सूचनेचे पालन करून दुकानदारांनी प्रशासनास सहकार्य करावे.
.
ग्रामीण भागात लसीकरणास प्रतिसाद द्या
अकोला- जिल्ह्यात कोविड लसीकरणही सुरु आहे. तुलनेने ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. तरी ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करुन घ्यावे. विशेषत: 60 वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षे वयावरील व सहव्याधी असणाऱ्या सर्व नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
ताप असेल तर चाचणी करा
अकोला- जिल्ह्यातील लहान मोठ्या खाजगी रुग्णालयात ताप, खोकला, कफ इत्यादी आजाराच्या रुग्णांवर उपचार करताना या रुग्णांच्या कोविड चाचण्या करणे आवश्यक आहे. तथापि चाचण्या न करता उपचार सुरु ठेऊन नंतर अत्यवस्थ रुग्ण हे शासकीय इस्पितळात संदर्भित केले जातात. अशा रुग्णांच्या संदर्भांत संबंधित डॉक्टर्सवर जबाबदारी निश्चित करा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
000000
जि.प., पं.स. रिक्त पद निवडणुकीसाठी
मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम
अकोला - राज्यातील सहा जिल्हा परिषदेतील 85 निवडणूक विभाग व त्याअंतर्गत 37 पंचायत समित्यांमधील 144 निर्वाचक गणातील रिक्त पदांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करणाचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
तो याप्रमाणे – अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीवरुन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरीता तयार केलेल्या मतदार यादीवर हरकत व सूचना मागविणे दि. 5 एप्रिल, हरकती व सूचना दाखल करणाचा अंतिम दिनांक 12 एप्रिल, मतदार याद्या अधिप्रमाणित करण्याचा दिनांक 20 एप्रिल, छापील याद्या माहितीसाठी ठेवण्याची सूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक 20 एप्रिल, तर मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 27 एप्रिल.