मतदान यंत्रे केली सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 01:52 AM2017-10-06T01:52:42+5:302017-10-06T01:53:53+5:30

Sealed the polling machines | मतदान यंत्रे केली सील

मतदान यंत्रे केली सील

Next
ठळक मुद्देग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २0१७ नवीन शासकीय धान्य गोदाम क्र-६ येथे पार पाडण्यात आली लेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचे सीलिंगची प्रक्रिया


लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २0१७ अंतर्गत मूर्तिजापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींची निवडणूक ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यासाठी सुमारे १५९ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी वापरण्यात येणार्‍या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचे सीलिंगची प्रक्रिया २ ऑक्टोबर रोजी मूर्तिजापूर येथील नवीन शासकीय धान्य गोदाम क्र-६ येथे पार पाडण्यात आली.
यासाठी ग्रामपंचायतनिहाय व्यवस्था करण्यात आली होती. संबंधित ग्रामपंचायतचे निवडणूक निर्णय अधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांची सीलिंगच्या प्रक्रियेत नियुक्ती करण्यात आली होती. सर्व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे ही उमेदवार व उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत मोहोरबंद करण्यात आली. त्यानंतर मोहोरबंद इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे सुरक्षा कक्षात ठेवण्यात आली आहे. सदर सर्व कार्यवाही निवडणूक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी भागवत सैंदाणे यांच्या सूचनेनुसार आणि निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार राहुल तायडे, निवडणूक नायब तहसीलदार उमेश बनसोड, निवासी नायब तहसीलदार डाबेराव, नायब तहसीलदार वैभव फरतारे तसेच मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडली. ग्रामपंचायत निवडणुकीतील महत्त्वाचा टप्पा मूर्तिजापूर तहसीलमार्फत पूर्ण करण्यात आला. 

Web Title: Sealed the polling machines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.