व्हॉट्स अँपच्या माध्यमातून चोरी गेलेल्या कारचा शोध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 02:08 AM2017-10-14T02:08:50+5:302017-10-14T02:10:52+5:30
यवतमाळ जिल्हय़ातील नेर परसोपंत येथून चोरी गेलेल्या कारचा अकोला सायबर पोलिसांनी व्हॉट्स अँपच्या माध्यमातून शोध घेतला आणि नागपूर पोलिसांना माहिती कळविली. त्यामुळे कार लंपास करणार्या पती, पत्नीस नागपूर पोलिसांनी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : यवतमाळ जिल्हय़ातील नेर परसोपंत येथून चोरी गेलेल्या कारचा अकोला सायबर पोलिसांनी व्हॉट्स अँपच्या माध्यमातून शोध घेतला आणि नागपूर पोलिसांना माहिती कळविली. त्यामुळे कार लंपास करणार्या पती, पत्नीस नागपूर पोलिसांनी अटक केली.
यवतमाळ जिल्हय़ातील नेर परसोपंत येथून ३ ऑक्टोबर रोजी एमएच ३६ एच ४५४४ क्रमांकाची कार चोरी झाली होती. या प्रकरणात पंकज दादाराव भोकरे (३२ रा. व्याहडी ता. नेर) यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या घरी काम करणार्या मुन्ना धुर्वे व त्याच्या पत्नीने संगनमत करून त्यांची कार चोरून नेली. कार मालकाने सायबर पोलीस ठाणे अकोला येथील पोलीस कर्मचारी प्रशांत केदारे यांना चोरी झालेल्या कारबाबत माहिती दिली. केदारे यांनी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रवीण धुमाळ यांच्या मार्गदर्शनात व्हॉट्स अँपवर आरोपी व कारचे फोटो प्रसारित केले आणि अवघ्या काही तासांमध्ये कारसह आरोपी दाम्पत्य मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या केळवद(जि. नागपूर) येथे असल्याची माहिती मिळाली.