विदर्भात दुसऱ्या डोसचे लसीकरण संथ गतीने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:14 AM2021-06-10T04:14:29+5:302021-06-10T04:14:29+5:30
लोकांमध्ये उत्सुकता, मात्र लस मिळेना लोकांमध्ये लसीची उत्सुकता असली, तरी विदर्भातील अकराही जिल्ह्यांना गरजेनुसार लस उपलब्ध होत नसल्याने ...
लोकांमध्ये उत्सुकता, मात्र लस मिळेना
लोकांमध्ये लसीची उत्सुकता असली, तरी विदर्भातील अकराही जिल्ह्यांना गरजेनुसार लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाची गती मंदावली आहे. लस उपलब्ध झाली, तरी मोजक्याच केंद्रांवर लसीकरण सुरू असल्याने लाभार्थींना लस मिळणे कठीण झाले आहे.
तरुणाईला प्रतीक्षा २१ जूनची
राज्यात १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लाभार्थींचे लसीकरण ठप्प पडले आहे. दरम्यान, २१ जूनपासून या गटातील लसीकरणास सुरुवात होणार असल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे तरुणाई २१ जूनची प्रतीक्षा करीत आहे.
जिल्हानिहाय लसीकरण (कोविन डॅशबोर्डनुसार)
जिल्हा - झालेले एकूण लसीकरण
अकोला - ३, ३५,४०६
नागपूर - १३,३५,१५४
अमरावती - ५२२, ७५०
बुलडाणा - ४,७०,९५१
यवतमाळ - ४,६१,६४८
वाशिम - २,६६,७६२
भंडारा - ३, ०५,७५८
वर्धा - ३,०४, ६२८
गोंदिया - ३,११,९२४
गडचिरोली - १,७८, ३४४
चंद्रपूर - ४,०४,५५४