अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 10:28 AM2020-09-04T10:28:43+5:302020-09-04T10:28:55+5:30
३,०११ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत प्रवेशासाठी यादी जाहीर करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : इयत्ता अकरावीची विज्ञान शाखेतील प्रवेश केंद्रीय पद्धतीद्वारे आॅनलाइन पद्धतीने सुरू असून, यावर्षी ८,९५५ जागांसाठी एकूण ३ हजार ७२५ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३,०११ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत प्रवेशासाठी यादी जाहीर करण्यात आली. आता प्रवेशाची दुसरी फेरी २ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे.
पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत प्रवेश घेणे बंधनकारक होते. त्यानुसार बहुतांश विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. तरीसुद्धा महानगरातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या जवळपास ३० टक्के जागा रिक्त आहेत. कोरोनामुळे बरेच विद्यार्थी आॅनलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरू शकले नाहीत. तसेच बरेच विद्यार्थ्यांनी कमी पर्याय निवडल्यामुळे त्यांना कुठेच प्रवेश मिळाला नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी २ सप्टेंबरपासून दुसºया प्रवेश फेरीला सुरुवात झाली आहे. विद्यार्थी दुसºया फेरीकरिता प्रवेश अर्ज करू इच्छितात. त्या सर्व विद्यार्थ्यांनी ७ सप्टेंबरपर्यंत दररोज दुपारी २ ते ५ या वेळात भारत स्काउट गाइड कार्यालय वसंत स्टेडियमजवळ, अकोला येथे संपर्क साधावा. दुसºया प्रवेश फेरीसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दुसरी फेरीसाठी २ ते ७ सप्टेंबरपर्यंत प्रवेश अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. दहा सप्टेंबर रोजी दुसºया फेरीची प्रवेश यादी जाहीर करण्यात येईल. तसे ११ ते १४ सप्टेंबरदरम्यान दुसºया फेरीतील प्रवेश निश्चित करण्यात येतील. अकरावी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करावा, असे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी कळविले आहे.