दुसऱ्या लाटेत रुग्ण पाचपटीने; मृत्यू तीनपटीने वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:23 AM2021-06-09T04:23:18+5:302021-06-09T04:23:18+5:30

पहिली लाट (ऑक्टोबरपर्यंत) एकूण रुग्ण - ८,३९८ मृत्यू- २८१ बरे झाले- ७९०२ कालावधी- ०७ महिने पहिली लाट ओसरल्यानंतर (नोव्हेंबर ...

In the second wave the patient five times; Deaths tripled! | दुसऱ्या लाटेत रुग्ण पाचपटीने; मृत्यू तीनपटीने वाढले!

दुसऱ्या लाटेत रुग्ण पाचपटीने; मृत्यू तीनपटीने वाढले!

Next

पहिली लाट (ऑक्टोबरपर्यंत)

एकूण रुग्ण - ८,३९८

मृत्यू- २८१

बरे झाले- ७९०२

कालावधी- ०७ महिने

पहिली लाट ओसरल्यानंतर (नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१)

एकूण रुग्ण- ३,२२२

मृत्यू- ५५

बरे झाले- २६६२

कालावधी- तीन महिने

दुसऱ्या लाटेची स्थिती (फेब्रुवारी ते ७ जून)

एकूण रुग्ण - ४५,०८६

मृत्यू - ७६८

बरे झाले - ४२,५२८

दुसऱ्या लाटेचा कालावधी - चार महिने

तिसरी लाट येण्यापूर्वीच रोखा

दुसरी लाट ओसरत असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा पूर्वतयारी करीत आहे, मात्र ही लाट येण्यापूर्वीच तिला रोखण्याची जबाबदारी सर्वसामान्य अकोलेकरांची आहे. त्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क, हात स्वच्छ धुणे, इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याची गरज आहे. तसेच लहान मुलांना कोविडच्या संसर्गापासून वाचविण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले नियम शिथिल करण्यात आले आहेत; मात्र नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. स्वत:सह इतरांना कोरोनापासून वाचविण्यासाठी त्रिसूत्रीचे पालन करावे. बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

Web Title: In the second wave the patient five times; Deaths tripled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.