कलम ६६अ सर्वाेच्च न्यायालयाकडून रद्द , शासनाकडून नाेटिफिकेशन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:13 AM2021-07-08T04:13:49+5:302021-07-08T04:13:49+5:30
शहरातील पाेलीस ठाण्यात झाले हाेते गुन्हे दाखल शहरातील सिटी काेतवाली, रामदास पेठ तसेच जुने शहर पाेलीस ठाण्यात बऱ्याच वर्षांपूर्वी ...
शहरातील पाेलीस ठाण्यात झाले हाेते गुन्हे दाखल
शहरातील सिटी काेतवाली, रामदास पेठ तसेच जुने शहर पाेलीस ठाण्यात बऱ्याच वर्षांपूर्वी आक्षेपार्ह पाेस्ट केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले हाेते़ देवी, देवतांच्या तसेच महामानवांच्या संदर्भात आक्षेपार्ह पाेस्ट करणाऱ्यांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले हाेते़ मात्र २०१५ नंतर अशा प्रकारची कारवाई केली नसल्याची माहिती आहे़
काय हाेते कलम
साेशल मीडियावर देवी, देवता, महामानव, राजकीय पदाधिकारी यांच्या संदर्भात किंवा कुणाच्याही भावना दुखावतील अशा प्रकारची आक्षेपार्ह पाेस्ट करणाऱ्यांविरुद्ध कलम ६६ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत हाेता़ त्यानंतर आराेपींवर अटकेची कारवाईही तातडीने करण्यात येते़ या कलमाचा काही ठिकाणी गैरवापरही करण्यात आला आहे़ त्यामुळे हे कलम रद्द करण्यात आल्याची माहिती आहे़
पाेलिसही संभ्रमात
सर्वाेच्च न्यायालयाने कलम ६६ अ हे मार्च २०१५ नंतर रद्द करण्यात आले आहे़ मात्र शासनाने नाेटिफिकेशन जारी न केल्याने पाेलीस अशा प्रकारची कारवाई करताना संभ्रमात असल्याची माहिती पाेलीस अधिकाऱ्याने दिली़