अकोला मार्गे सिकंदराबाद-भावनगर विशेष रेल्वे शुक्रवारपासून

By Atul.jaiswal | Published: July 17, 2024 03:15 PM2024-07-17T15:15:20+5:302024-07-17T15:15:41+5:30

अकोला : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण-मध्य रेल्वेने सिकंदराबाद ते गुजरात राज्यातील भावनगरदरम्यान १९ जुलैपासून साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस ...

Secunderabad-Bhavnagar Special Train via Akola from Friday | अकोला मार्गे सिकंदराबाद-भावनगर विशेष रेल्वे शुक्रवारपासून

अकोला मार्गे सिकंदराबाद-भावनगर विशेष रेल्वे शुक्रवारपासून

अकोला : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण-मध्य रेल्वेने सिकंदराबाद ते गुजरात राज्यातील भावनगरदरम्यान १९ जुलैपासून साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या अप व डाउन अशा प्रत्येकी चार फेऱ्या होणार असून, अकोला रेल्वेस्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे.

रेल्वेने जारी केलेल्या पत्रकानुसार, सिंकदराबाद-भावनगर विशेष एक्स्प्रेस १९ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत दर शुक्रवारी सिकंदराबाद स्थानकावरून रात्री २०:०० वाजता रवाना होऊन रविवारी पहाटे ०५:५५ वाजता भावनगर स्थानकावर पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात भावनगर-सिकंदराबाद विशेष एक्स्प्रेस २१ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत दर रविवारी भावनगर स्थानकावरून सकाळी १०:१५ वाजता रवाना होऊन सोमवारी १५:४५ वाजता सिकंदराबाद स्थानकावर पोहोचणार आहे.

Web Title: Secunderabad-Bhavnagar Special Train via Akola from Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला