थकित वेतनासाठी महावितरणच्या सुरक्षा रक्षकांनी दिले धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 06:01 PM2018-05-17T18:01:27+5:302018-05-17T18:01:27+5:30

अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे वेतन गत सहा महिन्यांपासून थकीत असून, थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे, या मागणीसाठी सुरक्षा रक्षकांनी गुरुवारी येथील विद्युत भवन समोर धरणे दिले.

security guard of the MSEDCL on Dharna | थकित वेतनासाठी महावितरणच्या सुरक्षा रक्षकांनी दिले धरणे

थकित वेतनासाठी महावितरणच्या सुरक्षा रक्षकांनी दिले धरणे

googlenewsNext
ठळक मुद्देअमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील २५१ सुरक्षा रक्षकांचे सहा महिन्यांचे वेतन प्रलंबित आहे. सहा महिन्यांपासून वेतन न झाल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. अर्ज, विनंत्या करूनही हा प्रश्न मार्गी न लागल्यामुळे अखेर या सुरक्षा रक्षकांनी गुरुवारी विद्युत भवन येथे धरणे आंदोलन केले.


अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे वेतन गत सहा महिन्यांपासून थकीत असून, थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे, या मागणीसाठी सुरक्षा रक्षकांनी गुरुवारी येथील विद्युत भवन समोर धरणे दिले.
अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील २५१ सुरक्षा रक्षकांचे सहा महिन्यांचे वेतन प्रलंबित आहे. हे सुरक्षा रक्षक अकोला जिल्ह्यातील महावितरणच्या अकोला ग्रामीण व शहर विभाग, आकोट विभाग, तेल्हार, पातूर, बाळापूर, बार्शीटाकळी व मुर्तीजापूर उपविभागात कार्यरत आहेत. गत सहा महिन्यांपासून वेतन न झाल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. अर्ज, विनंत्या करूनही हा प्रश्न मार्गी न लागल्यामुळे अखेर या सुरक्षा रक्षकांनी गुरुवारी महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवन येथे धरणे आंदोलन केले. महाराष्ट्र औद्योगिक व इतर श्रमिक कामगार संघटनेच अध्यक्ष बदरुज्जमा, जिल्हाध्यक्ष राहुल वाघ, जिल्हा संघटक अशोक अबगड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्य अभियंत्यांना मागणीचे निवेदनही सादर करण्यात आले. थकीत वेतन तातडीने अदा करून कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. धरणे मंडपात जिल्हाभरातून आलेले सुरक्षा रक्षक उपस्थित होते. या आंदोलनास स्वाभीमानी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शरद खोले, प्रमोद लोडम, दिलीप दाळू, किल्लेदार, एस. एन. बावने यांनी उपस्थित राहूल पाठिंबा दर्शविला. इंटक झोनचे अध्यक्ष बी. के. मनवर यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

 

Web Title: security guard of the MSEDCL on Dharna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.