‘जीएमसी’त मुलींच्या वसतिगृहात सुरक्षा रक्षकाचे अश्लील चाळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:11 PM2019-09-30T12:11:59+5:302019-09-30T12:12:17+5:30

शुक्रवार, २७ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा हा प्रकार घडला असून, संतप्त मुलींनी याप्रकरणी जीएमसी प्रशासनाकडे तक्रार केली.

Security guards misbehave at girls' hostel in 'GMC'! | ‘जीएमसी’त मुलींच्या वसतिगृहात सुरक्षा रक्षकाचे अश्लील चाळे!

‘जीएमसी’त मुलींच्या वसतिगृहात सुरक्षा रक्षकाचे अश्लील चाळे!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मुलींच्या सुरक्षेसाठी तैनात एका सुरक्षा रक्षकानेच मुलींसमोर अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात घडला. यापूर्वीही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मुलींच्या वसतिगृहात असे प्रकार घडले असून, त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. यामुळे महाविद्यालयाची अब्रू राखली जात असली, तरी मुलींची अब्रू मात्र धोक्यात आहे.
सर्वोपचार रुग्णालय परिसरातच वैद्यकीय विद्यार्थिनींचे वसतिगृह आहे. या ठिकाणी मुलींना पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याने रात्री पाण्यासाठी वसतिगृहाबाहेर पडावे लागते. मुलींच्या सुरक्षेसाठी येथे एका वयस्क सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आली; परंतु या सुरक्षा रक्षकाने मुलींसमोरच चक्क अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवार, २७ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा हा प्रकार घडला असून, संतप्त मुलींनी याप्रकरणी जीएमसी प्रशासनाकडे तक्रार केली. यावेळी डॉ. श्यामकुमार शिरसाम यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिसांनीही घटनास्थळ गाठले. मुलींनी याप्रकरणी तक्रारही दिली; मात्र त्यानंतर मुलींनी तक्रार मागे घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 

दबावतंत्र की बदनामीची भीती?
जीएमसीत मुलींच्या वसतिगृहात यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. वर्षभरापूर्वी एक निर्वस्त्र व्यक्ती मुलींच्या वसतिगृहात शिरल्याची घटना घडली होती. अशा घटना वारंवार होत असल्या, तरी केलेल्या तक्रारी मागे घेतल्याची माहिती आहे. या तक्रारी मागे घेण्यासाठी दबाबतंत्राचा उपयोग होत आहे, की मुलींमध्ये बदनामीची भीती, हा संशोधनाचा विषय आहे.


मुलींना पाहून इशारे
मुलींसमोर अश्लील चाळे करण्याचा प्रकार ताजा असतानाच दुसऱ्याच दिवशी एका आॅटो चालकाने विद्यार्थिनींना वाईट हेतूने इशारे केल्याचा प्रकार घडल्याची माहिती वैद्यकीय सूत्राने दिली आहे; परंतु बदनामी होईल म्हणून या विद्यार्थिनी समोर येण्यास घाबरत आहेत.

 

Web Title: Security guards misbehave at girls' hostel in 'GMC'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.