राज्यात २२ जिल्ह्यात घेणार यावर्षी ग्राम बिजोत्पादन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 02:18 PM2018-06-03T14:18:06+5:302018-06-03T14:18:06+5:30
अकोला : यावर्षीच्या खरीप हंगामात राज्यातील २२ जिल्ह्यात ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार असून, केंद्र व राज्य शासनाच्या या महत्त्वकांक्षी योजनेमध्ये शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे पुरवठा केला जाणार आहे.
अकोला : यावर्षीच्या खरीप हंगामात राज्यातील २२ जिल्ह्यात ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार असून, केंद्र व राज्य शासनाच्या या महत्त्वकांक्षी योजनेमध्ये शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठीची मंजुरी शासनाने शनिवारी दिली. ही योजना महाराष्टÑ बियाणे महामंडळ (महाबीज) राबविणार आहे.
शेतकºयांनीच दर्जेदार बियाणे निर्माण करण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. सुरुवातीला सोयाबीन व धान या दोन पिकांचे बीजोत्पादन घेतले जाणार आहे. याकरिता सोयाबीन जे एस-३५ वाणाची निवड करण्यात आली असून, पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली तसेच नागपूर विभागातील गडचिरोली,भंडारा, गोंदिया व संपूर्ण कोकण विभाग वगळून इतर २२ जिल्ह्यात हे वाण बीजोत्पादनासाठी वापरले जाणार आहे. सोयाबीन बियाणाची ३० किलोची एक गोणी शेतकºयांना १,३५० रुपयाला उपलब्ध करण्यात येईल. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या पाच जिल्ह्यात धान पिकाचे बीजोत्पादन घेतले जाणार आहे. एमटीयू-१०१०, एमटीयू-१००१, आयआर-६४ व सुवर्णा या वाणांची २५ किलोची गोणी ४६२.५० रुपयांना उपलब्ध करण्यात येईल. जेजीएल-१७९८ वाणाची २५ किलोची गोणी ६८७.५० रुपये तर कर्जत-३ धान बियाणाची एक गोणी ४०० रुपयांना अनुदानावर दिली जाणार आहे.
शेतकरी गट, उत्पादक कंपन्यांकडून घेणार बियाणे
राज्यातील अधिकृत शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्याकडे उत्पादित व प्रमाणित सोयाबीन उपलब्ध असल्यास महाबीज त्यांच्याकडून हे बियाणे खरेदी करणार आहे. त्यासाठी शेतकरी गट, उत्पादक कंपन्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन महाबीजने केले आहे.
परमीट उपलब्ध
ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमासाठी एक एकर क्षेत्र मर्यादा असून, यासाठी लगणारे परमीट नजिकच्या कृषी विभाग तसेच महाबीज कार्यालयात उपलब्ध आहेत.
ग्राम बीजोत्पादन शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून,याकरिता भरीव अनुदान उपलब्ध करण्यात आले. शेतकºयांनी लोकवाट्याची रक्कम भरू न हे बियाणे घेऊन जावे, त्यासाठीचे परमीट उपलब्ध आहे.
रामचंद्र नाके, महाव्यवस्थापक (विपणन),
महाबीज,अकोला.