पेरलेले बियाणे उगवलेच नाही; शेतकऱ्यांच्या ८२ तक्रारी, तपासणी सुरु

By संतोष येलकर | Published: July 28, 2023 06:53 PM2023-07-28T18:53:03+5:302023-07-28T18:53:15+5:30

यंदाच्या खरीप हंगामात पेरणीनंतर बियाणे उगवले नसल्याच्या ८२ तक्रारी शेतकऱ्यांकडून जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांकडे २६ जुलैपर्यंत प्राप्त झाल्या आहेत.

seed sown did not grow 82 complaints of farmers, investigation started | पेरलेले बियाणे उगवलेच नाही; शेतकऱ्यांच्या ८२ तक्रारी, तपासणी सुरु

पेरलेले बियाणे उगवलेच नाही; शेतकऱ्यांच्या ८२ तक्रारी, तपासणी सुरु

googlenewsNext

अकोला : यंदाच्या खरीप हंगामात पेरणीनंतर बियाणे उगवले नसल्याच्या ८२ तक्रारी शेतकऱ्यांकडून जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांकडे २६ जुलैपर्यंत प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांकडून तज्ज्ञांच्या पथकांकडून तक्रारींची तपासणी सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. यंदाचा पावसाळा सुरु झाल्यानंतर महिनाभराच्या कालावधी पावसाने दांडी मारल्याने, जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरणी रखडली होती. गेल्या ५ जुलैपासून पावसाने हजेरी लावल्यानंतर खरीप पेरणी सुरु झाली. खरीप हंगामात जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन आणि कपाशी या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. 

त्यामध्ये पेरणी केल्यानंतर बियाणे उगवले नसल्याच्या ८२ तक्रारी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांमधील कृषी विभागाकडे २६ जुलैपर्यंत संबंधित शेतकऱ्यांकडून प्राप्त झाल्या. त्यामध्ये काही ठिकाणी शेतात पेरलेले बियाणे पूर्णतः उगवले नाही तर काही ठिकाणी पेरलेले बियाणे कमी प्रमाणात उगवले, अशा प्रकारच्या तक्रारींचा समावेश आहे. बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींचा अहवाल पंचायत समित्यांकडून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला प्राप्त झाला असून, बियाणे उगवले नसल्याच्या संबंधित तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांकडून तज्ज्ञांच्या पथकांद्वारे सुरु करण्यात आल्याचे जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

तालुकानिहाय शेतकऱ्यांकडून
प्राप्त तक्रारींची अशी आहे संख्या !
तालुका             तक्रारी

  • पातूर             २५
  • बार्शिटाकळी            १५
  • अकोला             १४
  • मूर्तिजापूर             १२
  • बाळापूर             ०८
  • तेल्हारा             ०५
  • अकोट             ०३

 
सोयाबीनच्या ८१ तर कपाशी बियाण्याची एक तक्रार  
जिल्ह्यात २६ जुलैपर्यंत सोयाबीन आणि कपाशी बियाणे उगवले नसल्याच्या ८२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामध्ये पेरणीनंतर सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या ८१ तक्रारी प्राप्त झाल्या असून, कपाशीचे बियाणे उगवले नसल्याची एक तक्रार प्राप्त झाली आहे.

तालुकास्तरीय समित्या करणार तक्रारींचे निवारण 
पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांकडून तपासणी सुरु करण्यात आली आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित तालुकास्तरीय तक्रार निवार समित्यांकडून बियाणे उगवले नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी केलेलापेरणीचा खर्च बुडाला
पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या. त्यानुषंगाने बियाणे उगवले नसल्याने, पेरणीसाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्च बुडाला आहे. त्यामुळे बियाणे उगवले नसल्याच्या प्रकरणात शेतकऱ्यांना संबंधित बियाणे कंपन्यांकडून किती आणि कधी नुकसान भरपाई दिली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: seed sown did not grow 82 complaints of farmers, investigation started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.