महाकवी वामनदादांच्या विचारांचे बीज नव्या पिढीला मार्गदर्शक - पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:23 AM2021-08-21T04:23:03+5:302021-08-21T04:23:03+5:30
पिंपरडाेळी : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या गीतांनी भारतीय समाजमनात नवचेतना निर्माण केली. आंबेडकरी चळवळीत संपूर्ण आयुष्य वेचणारे महाकवी वामनदादांच्या ...
पिंपरडाेळी : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या गीतांनी भारतीय समाजमनात नवचेतना निर्माण केली. आंबेडकरी चळवळीत संपूर्ण आयुष्य वेचणारे महाकवी वामनदादांच्या विचारांचे बीज नवीन पिढीला मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन प्रख्यात कवी, समीक्षक प्रा. देवानंद पवार यांनी केले.
पिंपरडाेळी येथील जेतवन बुद्ध विहारात महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती उत्सवानिमित्त आयाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. कार्यक्रमाची सुरुवात प्रा. दिलीप ताजने यांनी त्रिशरण, पंचशील ग्रहण करून केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वर्धमान ताजने हाेते. या वेळी प्रवीण ताजने, जेतवन बुद्ध विहार समितीचे पदाधिकारी धम्मानंद ताजने, बाबूराव ताजने, गवई, साेनाेने यांची उपस्थिती हाेती. या वेळी स्मृतीशेष माेहन लाभाजी पवार यांच्या स्मृतीनिमित्त जेतवन बुद्ध विहारास महाकवी वामनदादा कर्डक यांची प्रतिमा भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप ताजने यांनी केले. आभार जेतवन बुद्धविहार समितीचे अध्यक्ष दीपक ताजने यांनी मानले. या वेळी वामनदादांच्या गीतांचा जयघाेष करण्यात आला.