आयकर विभाग,पोलीस शोधताहेत चार कोटीवरील शंभर रुपयाचे रहस्य!

By admin | Published: November 14, 2016 02:48 AM2016-11-14T02:48:12+5:302016-11-14T02:48:12+5:30

मलकापूर व्यापा-याच्या चार कोटी रुपये जप्ती प्रकरणी रविवारीही केली कारवाई.

Seeking income tax department, Police searching for Rs. | आयकर विभाग,पोलीस शोधताहेत चार कोटीवरील शंभर रुपयाचे रहस्य!

आयकर विभाग,पोलीस शोधताहेत चार कोटीवरील शंभर रुपयाचे रहस्य!

Next

गणेश मापारी
खामगाव, दि. १३- महाराष्ट्र -मध्य प्रदेशच्या सीमेवर शुक्रवारी एका लोहा व्यावसायिकाकडून जप्त करण्यात आलेल्या चार कोटी रुपयांमध्ये प्रत्येक एक कोटी रुपयांसोबत शंभर रुपयाची नोट ठेवण्यात आली होती. त्यामुळे कोटी रुपयासोबतच्या ह्यशंभर रुपयाह्णमध्ये जप्त करण्यात आलेल्या चार कोटीचे रहस्य दडलेले असून, मध्य प्रदेश पोलीस आणि आयकर विभागाने त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील शब्बीर हुसैन हे लोहा व्यावसायिक शुक्रवारी सायंकाळी कार क्रमांक एम.एच.२८ एएन २१५३ या वाहनाने मलकापूरवरुन मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर येथे जात होते. दरम्यान महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या अंतुर्ली गावानजिकच्या आंतरराज्यीय तपासणी नाक्यावर शहापुरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक कमल दवाणे तसेच लाभोराम पगेरा, मनीष यादव, टिकेश्‍वर निर्मल यांनी शब्बीर हुसैन यांचे वाहन थांबवून त्यांच्या वाहनाची झाडाझडती घेण्याचा प्रयत्न केला असता, शब्बीर हुसैन यांच्या कारमध्ये असलेल्या तीन सुटकेसमध्ये तब्बल ४ कोटी रुपये आढळून आले होते. विशेष म्हणजे प्रत्येक एक कोटी रुपयांसोबत शंभर रुपयांची नोट ठेवण्यात आली होती. दरम्यान, मध्य प्रदेशातील नेपानगर या विधानसभा मतदारसंघाची १९ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. त्याचप्रमाणे पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र ५00 व १ हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. मात्र बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी र्मयादा घालण्यात आली आहे. त्यामुळे ५00 व १ हजार रुपयांच्या नोटाचे बदल्यात १00 रुपयांच्या नोटा देणारे रॅकेट असल्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. कोटी रुपयांसोबतची शंभर रुपयांची नोट निवडणुकीच्या अनुषंगाने होती किंवा अवैधरीत्या नोटा बदलविण्यासाठी ह्यकोडह्ण म्हणून ठेवण्यात आली होती का? या दोन्ही बाबी मध्य प्रदेश पोलीस आणि मध्य प्रदेश आयकर विभाग तपासून पाहत आहेत.

आणखी दोन वाहनचालकांकडून सहा लाखांची रोकड जप्त
अंतुर्ली तपासणी नाक्यावर मध्य प्रदेश पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरूच आहे. रविवारी या तपासणी नाक्यावरून इंदूरकडे मारुती ओमनी वाहन क्रमांक एम.पी.0३ बीसी २७४८ ची तपासणी करण्यात आली असता, त्यामध्ये २ लाख ६९ हजार रुपये आढळून आले. सदर रक्कम वाहनातील रवींद्र सोनाजी पाटील व सोनाजी तुकाराम पाटील रा.इंदूर मध्य प्रदेश यांच्याकडून जप्त करण्यात आली. तसेच विना क्रमांकाच्या दुचाकीने जात असलेले प्रदीप गोकुलप्रसाद शिवहरे यांच्याकडे ३ लाख ६0 हजार रुपये आढळून आले. ही रक्कमसुद्धा पोलिसांनी जप्त केली असून, चौकशी करण्यात येत आहे. एकूणच चार कोटींची रक्कम आढळल्यानंतर पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे.

आयकर विभागाकडून झाडाझडती
पोलीस कारवाईत जप्त करण्यात आलेले चार कोटी रुपयांची माहिती आयकर विभागाला देण्यात आली आहे. त्यामुळे आयकर विभागाने शब्बीर हुसैन यांच्याकडे आलेल्या रकमेसोबतच त्यांच्या व्यवसायाबाबत झाडाझडती सुरू केली आहे.

Web Title: Seeking income tax department, Police searching for Rs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.