गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
By admin | Published: March 8, 2016 02:39 AM2016-03-08T02:39:01+5:302016-03-08T02:39:01+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची खोलेश्वरमध्ये कारवाई.
अकोला: खोलेश्वरमधील एका पानटपरीवर दोन युवक एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस घेऊन उभे असताना त्यांना स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी अटक केली. यामधील एका युवकाजवळून गावठी पिस्तूल तर दुसर्या युवकाजवळून जिवंत काडतूस जप्त केले. खटाव जीन परिसरातील रहिवासी इसराज ऊर्फ सोनू खान बालाद्दीन खान व रजपुतपुरा येथील रहिवासी राजेश ऊर्फ सोनू तुळशीराम जयराज हे दोघे खोलेश्वर परिसरातील एका पानटपरीवर गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस घेऊन उभे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख जितेंद्र सोनवणे यांनी खोलेश्वरमधील पानटपरीवर छापा मारून दोन्ही युवकांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यामधील जयराज याच्याजवळून गावठी पिस्तूल तर इसराज खान याच्याकडून एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये सदर दोन्ही युवकांविरु द्ध आर्म्स अँक्ट च्या कलम ३, २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने गुटखा माफियांवरही कारवाई सुरू केली असून, सोमवारी गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस घेऊन फिरणार्यांना अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख जितेंद्र सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक निरी, दिनकर बुंदे, बाबुसिंह पट्टे, जय मंडावरे व रवी इरच्छे यांनी केली.