अकोला जिल्हा परिषदेत जप्तीची कारवाई टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 01:49 PM2020-01-04T13:49:04+5:302020-01-04T13:49:12+5:30
सेवानिवृत्त कक्ष अधीक्षकाचे सेवानिवृत्तीनंतर ६० हजार रुपये थकीत असल्याने न्यायालयामार्फत नियुक्त बेलीफकडून शुक्रवारी जिल्हा परिषदेत जप्तीची कारवाई होणार होती.
अकोला : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागातील सेवानिवृत्त कक्ष अधीक्षकाचे सेवानिवृत्तीनंतर ६० हजार रुपये थकीत असल्याने न्यायालयामार्फत नियुक्त बेलीफकडून शुक्रवारी जिल्हा परिषदेत जप्तीची कारवाई होणार होती; मात्र संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची थकीत रक्कम २० जानेवारीपर्यंत देण्यात येणार असल्याची हमी देण्यात आल्याने जप्तीची कारवाई टळली.
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागातील सेवानिवृत्त कक्ष अधीक्षक सुरेश चव्हाण यांना सेवानिवृत्तीनंतर ६० हजार रुपये मिळाले नाही.
सेवानिवृत्तीनंतर रक्कम जिल्हा परिषदेकडे रक्कम थकीत असल्याने यासंदर्भात संबंधित सेवानिवृत्त कक्ष अधीक्षक आणि न्यायालयामार्फत नियुक्त बेलीफ ३ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेत जप्तीच्या कारवाईसाठी दाखल झाले.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी चर्चा केल्यानंतर संबंधित सेवानिवृत्त कक्ष अधीक्षकाची थकीत रक्कम येत्या २० जानेवारीपर्यंत देण्यात येणार असल्याची हमी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषदेतील जप्तीची कारवाई टळली.