आळंदाच्या विद्यार्थ्यांची ‘शाळेबाहेरची शाळा’साठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:16 AM2021-01-15T04:16:29+5:302021-01-15T04:16:29+5:30
निहीदा: आळंदा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी प्रशिक गुणवंत माेहाेड याची ‘शाळेबाहेरची शाळा’ या कार्यक्रमासाठी निवड झाली असून, त्याची ...
निहीदा: आळंदा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी प्रशिक गुणवंत माेहाेड याची ‘शाळेबाहेरची शाळा’ या कार्यक्रमासाठी निवड झाली असून, त्याची मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीचे प्रसारण २३ जानेवारीला आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून करण्यात येणार आहे.
कोरोनाकाळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, शाळा बंद असल्यावरही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे, यासाठी आयुक्त कार्यालय, नागपूर व प्रथम या संस्थेच्या विद्यमाने नागपूर आकाशवाणी केंद्राच्या वतीने ‘शाळेबाहेरची शाळा’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे आतापर्यंत ९४ भाग प्रसारित झाले असून, ९५ व्या भागासाठी बार्शीटाकळी तालुक्यांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,आळंदा या शाळेतील इयत्ता दुसरीतील प्रशिक गुणवंत मोहोड याची निवड झाली. २ जानेवारीला नागपूर आकाशवाणीच्यावतीने प्रशिकची मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीचे प्रक्षेपण २३ जानेवारीच्या ‘शाळेबाहेरची शाळा’ कार्यक्रमातील ९५ व्या भागात नागपूर आकाशवाणीवर (५१२.८) सकाळी १०.३५ वाजता होणार आहे. प्रशिकच्या निवडीचे बार्शीटाकळी शिक्षण विभागाच्यावतीने काैतुक करण्यात आले.