फ्रीडम शाळेच्या बाल वैज्ञानिकांची इन्स्पायर अवॉर्डसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:25 AM2020-12-30T04:25:21+5:302020-12-30T04:25:21+5:30
----------------------------- अकोटात काँग्रेसच्या स्थापना दिन साजरा अकोट : काँग्रेस कमिटीतर्फे जयस्तंभ चौकात काँग्रेस स्थापना दिन साजरा करण्यात आला. यावेळी ...
-----------------------------
अकोटात काँग्रेसच्या स्थापना दिन साजरा
अकोट : काँग्रेस कमिटीतर्फे जयस्तंभ चौकात काँग्रेस स्थापना दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. ओ. म्हैसने, प्रशांत पाचडे, सारंग मालाणी, गजानन डाफे, डॉ.प्रमोद चोरे, ॲड. मनोज खंडारे, गजानन गावंडे, दशरथजी खवले, रघुनाथ धुमाळे, भूषण मोहोकार, वैभव पाचडे, फरहान पटेल, शरद ठाकरे, अरुण म्हैसने उपस्थित होते. (फोटो
-------------------
जेसीआय अध्यक्षपदी नितीन शेगोकार
अकोटः जेसीआयच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नितीन शेगोकार व सागर बोरोडे यांची सचिवपदी निवड करण्यात आली. जेसीआयच्या अनेक पदांवर नितीन शेगोकार यांनी कार्य केलेले आहे. तसेच रक्तदानाच्या क्षेत्रांमध्ये नेहमी कार्य करणारे सागर बोरोडे यांची सचिवपदी निवड केली आहे. (फोटो)
-------------------------
वाडेगाव येथील बॅंकेत नागरिकांची गर्दी
वाडेगाव : येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी खात्यावर जमा झाल्याने बॅंकेत शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांची गर्दी झाली होती. गर्दी वाढल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. बॅंकेत अनेक जण विनामास्क असल्याचे दिसून आले.
------------------------
तुरीवर अळींचे आक्रमण
तेल्हारा : तालुक्यातील ग्रामीण भागात तुरीवर अळींचे आक्रमण वाढल्याने शेतकरी चिंतित सापडला आहे. अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी फवारणी करीत असल्याचे चित्र आहे.
---------------------------
आपातापा येथील सीसीआय केंद्रात गर्दी
आपातापा : येथील सीसीआय केंद्रात कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. दररोज येथील सीसीआय केंद्रात ८० ते १०० ट्रॅक्टर येत असून, रस्त्यावर उभे राहत आहे. परिणामी या मार्गावर वाहतूक विस्कळीत होत आहे.
------------------------------------
अयोध्या मंदिर निर्माणासाठी गृहसंपर्क अभियान
अकोट : अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माणासाठी गृहसंपर्क अभियानासाठी येथे समन्वयकांची बैठक रविवारला पार पडली. कार्यक्रमात जिल्हा संयोजक संजय रोहणकर, जिल्हा संघचालक ॲड. मोहन आसरकर, अजय नवघरे, अजय कुळकर्णी, वृषभ मल्हले, तालुका संयोजक गजानन माकोडे, अनिल अप्पा गोंडागरे उपस्थित होते.
-------------------------
बाळापूर तालुक्यात सोमवारी १३२ अर्ज दाखल
बाळापूर : ग्रामीण भागात गुलाबी थंडीत राजकीय वातावरण तापले आहे. तीन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. तालुक्यात सोमवारी १३२ अर्ज दाखल झाले असून, आतापर्यंत एकूण १३६ अर्ज दाखल झाले आहेत.
-------------------
पीएचसी स्तरावर कोविड लसीकरणासंदर्भात मार्गदर्शन
बाळापूर : तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोविड-१९ लसीकरणासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. येणाऱ्या जानेवारी महिन्यात कोविड लसीकरण होण्याची शक्यता आहे.
---------------------------------