शाळासिद्धी कार्यक्रमांतर्गत राज्यात केवळ १४ टक्केच शाळांचे स्वयंमूल्यमापन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 03:47 PM2019-01-30T15:47:42+5:302019-01-30T15:47:54+5:30
अकोला: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मूल्यांकनासाठी शाळासिद्धी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शाळांचे स्वयंमूल्यमापनासाठी ३0 जानेवारी अंतिम मुदत दिली आहे; परंतु राज्यात केवळ १४ टक्के शाळांनी स्वयंमूल्यमापन केले आहे.
- नितीन गव्हाळे
अकोला: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मूल्यांकनासाठी शाळासिद्धी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शाळांचे स्वयंमूल्यमापनासाठी ३0 जानेवारी अंतिम मुदत दिली आहे; परंतु राज्यात केवळ १४ टक्के शाळांनी स्वयंमूल्यमापन केले आहे. मुदत संपायला अवघे तीन दिवस शिल्लक असताना अद्याप ८६ टक्के म्हणजेच राज्यातील ९३ हजार ४३९ शाळांनी स्वयंमूल्यमापन केलेले नाही.
शाळासिद्धी कार्यक्रमाच्या संकेतस्थळावर राज्यातील सर्व शाळांची माहिती भरून शाळा स्वयंमूल्यमापन करण्याचे निर्देश विद्या प्राधिकरणाकडून देण्यात आले होते. १00 टक्के शाळांचे स्वयंमूल्यमापन जानेवारी २0१९ अखेर पूर्ण करण्यास सांगितले होते. यासंदर्भात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागानेसुद्धा शाळांना सूचना दिल्या होत्या; परंतु जानेवारी महिन्याच्या अखेरीस राज्यातील १ लाख ९ हजार ११0 शाळांपैकी केवळ १५ हजार ६७१ शाळांनीच स्वयंमूल्यमापन केले आहे. अद्याप ९३ हजार ४३९ शाळांनी स्वयंमूल्यमापन केलेच नसल्याची माहिती समोर आली आहे. अकोला जिल्ह्यात केवळ ९.१३ टक्के, अमरावती जिल्ह्यात ५.५४ टक्के, बुलडाणा जिल्ह्यात १0.३४ टक्के, वाशिम-१९.१६ टक्के, यवतमाळ-८.४७ टक्केच शाळांनी स्वयंमूल्यमापन पूर्ण केले आहे. स्वयंमूल्यमापन करण्यात शाळा उदासीनता दाखवित असल्यामुळे या शाळांसाठी पुन्हा मुदत वाढविण्याची शक्यता आहे.