पातुरात ‘वंचित’चे आत्मक्लेश आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:22 AM2021-08-26T04:22:12+5:302021-08-26T04:22:12+5:30
पातूर : तालुक्यातील पिंपळखुटा येथील महिलांनी ग्रामसेवक उपलब्ध करून देण्याची मागणी करीत पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...
पातूर : तालुक्यातील पिंपळखुटा येथील महिलांनी ग्रामसेवक उपलब्ध करून देण्याची मागणी करीत पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गत दोन दिवसांपासून प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी जाऊन बेमुदत आंदोलनाला पाठिंबा देत गट विकास अधिकाऱ्यांच्या कक्षात बुधवार, दि. २५ ऑगस्ट रोजी ठिय्या देऊन ‘आत्मक्लेश’ आंदोलन सुरू केले. रात्री १० वाजताच्या सुमारास डिप्टी सीईओ यांनी मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने रात्री उशिरा उपोषण स्थगित करण्यात आले.
तालुक्यातील पिंपळखुटा येथे सात महिन्यांपासून ग्रामसेवक नसल्याने गावातील विकास खुंटला आहे. त्यामुळे गावातील सरपंचासह महिलांनी सोमवारपासून पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. याकडे प्रशासनाची डोळेझाक असल्याने बुधवारी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी धाव घेतली. यावेळी आंदोलनकर्त्या महिला या तीन दिवसांपासून रस्त्यावर आहेत, तरी प्रशासन व लोकप्रतिनिधी संवेदनशीलता दाखवित नसल्याचा आरोप वंचितने करीत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी बीडीओंच्या कक्षात ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांसह ‘आत्मक्लेश’ आंदोलन सुरू केले. यावेळी त्यांनी पिंपळखुटा येथे महिला ग्रामसेविकेची नियुक्ती करण्याची मागणी केली. दरम्यान, रात्री १० वाजताच्या सुमारास डीप्टी सीईओ बोटे यांनी कमिश्नरची परवानगी घेऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने रात्री उशिरा उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पराग गवई, निर्भय पोहरे, जि प.सदस्य विनोद देशमुख,डॉ. ओमप्रकाश धर्माळ, राजेश महल्ले, चरणसिंग चव्हाण, अविनाश खंडारे, राहुल सदार, अर्जुन टप्पे, अनिल राठोड, विष्णू डाबेराव, स्वप्नील सुरवाडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
------------------------------
आमदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता हरवली
तीन दिवसांपासून पिंपळखुटा येथील महिला मुलाबाळांसह बेमुदत उपोषणाला पातूर पंचायत समिती समोर बसले आहेत; मात्र प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे सुमारे सहा तासांपासून पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कक्षामध्ये आत्मक्लेश आंदोलन उपोषणकर्त्यांच्या उपस्थित सुरू आहे. यासंदर्भात तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिला आहे.
250821\img_20210825_205534.jpg
?????????