‘एक सेल्फी सुपर स्पेशालिटी’सोबत; एमआयएमचे अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:20 AM2021-08-29T04:20:28+5:302021-08-29T04:20:28+5:30

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला जवळपास दोन वर्षे उलटली आहेत. दरम्यानच्या काळात कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. आता तिसऱ्या लाटेचा ...

With ‘a selfie super specialty’; MIM's unique movement | ‘एक सेल्फी सुपर स्पेशालिटी’सोबत; एमआयएमचे अनोखे आंदोलन

‘एक सेल्फी सुपर स्पेशालिटी’सोबत; एमआयएमचे अनोखे आंदोलन

Next

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला जवळपास दोन वर्षे उलटली आहेत. दरम्यानच्या काळात कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. आता तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात येत असतानाही हे रुग्णालय अजूनही कार्यान्वित झालेले नाही. कोरोना काळात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झाल्यास नागरिकांना आरोग्य सुविधा मिळेल. यासाठी एमआयएमने अनेकवेळा निवेदने दिली, परंतु उपयोग झाला नाही. अखेर शुक्रवारी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी या रुग्णालयाच्या इमारतीसमोर सेल्फी काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. हे आंदोलन एमआयएमचे जिल्हा निरीक्षक डॉ. रहमान खान यांच्या मार्गदर्शनात शहराध्यक्ष अब्दुल मुनाफ आणि आसिफ खान यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या वेळी जावेद पठाण, चांद खान, शेख वसीम यांच्यासह एमआयएमचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: With ‘a selfie super specialty’; MIM's unique movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.