सिनेट निवडणुकीत कुलट, ठाकरे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 02:18 AM2017-10-18T02:18:18+5:302017-10-18T02:18:29+5:30

अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदवीधर, विद्या परिषद, अभ्यास मंडळ व प्राचार्य मतदारसंघातून सिनेट सदस्य निवडीसाठी रविवारी मतदान झाले. त्यानुसार मंगळवारी मतमोजणीला प्रारंभ होताच पहिल्या टप्प्यात विद्यापीठ प्राचार्य मतदारसंघातून अकोटचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, मूर्तिजापूरचे डॉ. संतोष ठाकरे यांनी विजय प्राप्त केला.

In the Senate elections, Thule won | सिनेट निवडणुकीत कुलट, ठाकरे विजयी

सिनेट निवडणुकीत कुलट, ठाकरे विजयी

googlenewsNext
ठळक मुद्देरात्री उशिरापर्यंत प्राचार्य मतदारसंघाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदवीधर, विद्या परिषद, अभ्यास मंडळ व प्राचार्य मतदारसंघातून सिनेट सदस्य निवडीसाठी रविवारी मतदान झाले. त्यानुसार मंगळवारी मतमोजणीला प्रारंभ होताच पहिल्या टप्प्यात विद्यापीठ प्राचार्य मतदारसंघातून अकोटचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, मूर्तिजापूरचे डॉ. संतोष ठाकरे यांनी विजय प्राप्त केला. उर्वरित मतदारसंघांची रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती, त्यामुळे निकाल हाती आला नाही. 
पहिल्या टप्प्यात विद्यापीठ शिक्षक मतदारसंघातून तीन जागांच्या निवडीसाठी मतमोजणी झाली. त्यानंतर विद्यापीठ शिक्षक महिला वर्गवारीची आणि विद्यापीठ शिक्षक सामान्य वर्गवारीची मतमोजणी करण्यात आली. प्राचार्य मतदारसंघातून १0 सदस्य निवडीसाठी एससी संवगार्तून अविनाश घरडे यांनी ७६ मते मिळवून विजय प्राप्त केला. प्रतिस्पर्धी श्रीप्रभू चापके यांना ५६ मतांवर समाधान मानावे लागले. ओबीसी संवर्गातून प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांना ७६, तर नंदकिशोर ठाकरे यांना ५४ मते मिळालीत. व्हीजेएनटी संवर्गात संजीव मोटके यांनी ६८ मते प्राप्त करून विजय प्राप्त केला. बाश्रीटाकळीचे मधुकर पवार यांना ५१ मते प्राप्त केली. प्राचार्य महिला वर्गवारीत संयोगिता देशमुख यांनी ७0 मते घेऊन विजय मिळविला. रात्री उशिरापर्यंत पदवीधर मतदारसंघ, शिक्षक मतदारसंघ आणि विद्यापीठ अभ्यास मंडळ मतदारसंघाची मतमोजणी सुरू होती. त्यामुळे या मतदारसंघांचे निकाल वृत्त लिहिस्तोवर हाती आले नव्हते. विविध मतदारसंघांमध्ये रिंगणात असलेल्या अकोल्यातील ३५ उमेदवारांपैकी केवळ दोनच उमेदवारांचे निकाल जाहीर झाले होते.

Web Title: In the Senate elections, Thule won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.