धोबी समाज आरक्षण संदर्भातील फाईल केंद्राकडे पाठवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:21 AM2021-01-16T04:21:43+5:302021-01-16T04:21:43+5:30
अकोला : मागील कित्येक वर्षांपासून धोबी समाज आरक्षण फाईल मुंबई मंत्रालयात अडकून पडली आहे. ती तत्काळ पूर्ण ...
अकोला : मागील कित्येक वर्षांपासून धोबी समाज आरक्षण फाईल मुंबई मंत्रालयात अडकून पडली आहे. ती तत्काळ पूर्ण करून केंद्राकडे पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले.
धोबी समाज आरक्षणचे राज्य कार्याध्यक्ष अनिल शिंदे व अध्यक्ष डी. डी. सोनटक्के प्रयत्न करीत आहेत. मात्र, आजपर्यंत आश्वासनपेक्षा काहीच पदरी पडले नाही. त्यामुळे १२ जानेवारीला कॅबिनेट बैठक बोलावून राज्यमंत्री ओमप्रकाश कडू यांनी संबंधित अधिकाऱ्यांना समक्ष बोलावून १५ दिवसात धोबी समाज आरक्षण फाईल दिल्लीकडे रवाना झाली पाहिजे, अन्यथा धोबी समाज आपल्या मंत्रालयासमोर कपडे धुओ आंदोलन करणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.
बैठकीस डी. डी. सोनटक्के, अनिल शिंदे, राजेंद्र खैरनार, सुनील पवार, जयराम वाघ, राजेंद्र म्हंकाळे, सुहास मोगरे, सुदेश चिंतराटे, गिरीष राऊत, संतोष सवतीकर, कृनाल वरणकर, अजय जगदाळे, ऋषिकेश राऊत, गणपतराव सोनावणे, गोपाळ मोकळकर, सुधीर खैरनार, विजय शिरसाट, सौ. उषाताई कानोजीय, सागर आतरकर, इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.