ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण १५ दिवसांत पूर्ण करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:18 AM2021-03-21T04:18:17+5:302021-03-21T04:18:17+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित कोविड लसीकरण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित कोविड लसीकरण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. मनिष शर्मा आदी उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्रस्तराव आशा स्वयंसेविकांच्यामार्फत गावांतील ४५ वर्षावरील दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींची यादी तयार करुन त्यांना लसीकरण करण्यात यावे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी लसीकरण केंद्र आठवड्यातील सहा दिवस सकाळी १० वाजतापासून लसीकरण होईपर्यंत सुरु ठेवावे. त्यासाठी प्रत्येक गावात ग्रामसेवकांव्दारे जनजागृती करुन नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी यावेळी दिल्या.
कर्मचाऱ्यांच्या कोविड चाचण्या
आठ दिवसांत पूर्ण करा!
जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या कोविड चाचण्या येत्या आठ दिवसात पूर्ण कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. तसेच ग्रामीण भागात कोविड चाचण्या वाढविण्यात वाढविण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
C