ज्येष्ठ नागरिकांना एप्रिलमध्ये कोविड लस मिळण्याची शक्यता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:20 AM2021-02-16T04:20:01+5:302021-02-16T04:20:01+5:30
ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचे अद्याप नियोजन नाही जिल्ह्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या आणि फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण यावरच आरोग्य विभागाचे लक्ष ...
ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचे अद्याप नियोजन नाही
जिल्ह्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या आणि फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण यावरच आरोग्य विभागाचे लक्ष केंद्रित आहे. त्यामुळे सध्या तरी ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाबाबत नियोजन झाले नाही. मार्च महिन्यात कोविन ॲपमध्ये लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांच्या नावांची माहिती अद्यावत करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आहे. यानंतरच ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे.
जिल्ह्याला मिळणार आणखी दहा हजार डोस
जिल्ह्यात आतापर्यंत दोन टप्प्यात १८ हजार कोविड लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. लसीकरणाची प्रक्रिया सुरूच असून, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्करसाठी आणखी १० हजार ९०० डोस मिळणार आहेत. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत जिल्ह्यासाठी हे डोस उपलब्ध होणार आहेत.
सध्या कोविड लसीकरण मोहिमेचे मिक्स सेशन सुरू आहे. याअंतर्गत आरोग्य कर्मचारी आणि इतर फ्रंटलाइन वर्कर यांना लसीचा डोस दिला जात आहे. तसेच ज्यांना पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झाले अशा लाभार्थींनाही लसीचा दुसरा डोस दिला जात आहे. ही प्रक्रिया मार्च महिन्यात संपणार असल्याने एप्रिलपासून ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याचे नियोजन करण्यात येईल. परंतु, सद्यस्थितीत फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाकडे लक्ष आहे.
- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण मोहीम, अकोला