वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे संपकालीन वेतन खात्यात जमा होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 01:42 PM2019-05-04T13:42:08+5:302019-05-04T13:42:15+5:30
अकोला: वरिष्ठ अधिकारी यांचा आदेश मिळताच वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे ७१ दिवसांचे संपकालीन वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे आश्वासन उच्च माध्यमिक अमरावती विभागीय सहसंचालक संजय जगताप यांनी गुरुवारी दिले आहे.
अकोला: वरिष्ठ अधिकारी यांचा आदेश मिळताच वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे ७१ दिवसांचे संपकालीन वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे आश्वासन उच्च माध्यमिक अमरावती विभागीय सहसंचालक संजय जगताप यांनी गुरुवारी दिले आहे. उच्च शिक्षण सहायक संचालकांची शिक्षक महासंघाचे शेखर भोयर यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आणि त्यांना प्राध्यापकांचे संपकालीन वेतन खात्यात जमा करण्याची मागणी केली.
आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी ७१ दिवसाचा संप पुकारला होता. या संपादरम्यानच्या कालावधीचे वेतन त्यांना देण्यात आले नाही. यावर उच्च न्यायालयानेसुद्धा प्राध्यापकांना संपकालीन वेतन अदा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतरही शासनाने प्राध्यापकांना वेतन अदा केले नाही. ७१ दिवसांचे संपकालीन वेतन अदा करावे, अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी केली, असता वरिष्ठांचे आदेश मिळताच वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकाचे संपकालीन वेतन अदा करण्याचे आश्वासन उच्च शिक्षण अमरावती विभागाचे सहसंचालक संजय जगताप यांनी दिले आहेत. यावेळी त्यांच्या सोबत अमरावती जिल्हा उपाध्यक्ष राहुल मोहोड, प्रा.डी.आर. बिजवे, प्रा. श्याम येवतीकर, प्रा.डॉ.यू.आर. कनेरकर, डॉ. श्रीकृष्ण उंबरहंडे, डॉ. युगंधरा राजगुरे, प्रा.के.आर. धात्रक, प्रा.डॉ. सुभाष शिरसाठ, प्रा. दुपारे, प्रा. प्रशांत यावले यांच्यासह वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक उपस्थित होते. (प्रतिनिधी)