विकतची लस घेण्यातही ज्येष्ठ आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:20 AM2021-03-10T04:20:12+5:302021-03-10T04:20:12+5:30

१५ शासकीय व आठ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणास प्रारंभ झाला आहे. या ठिकाणी काेविशिल्ड लस देण्यात येत आहे. जिल्ह्यात ८ ...

Senior leader in buying vaccines | विकतची लस घेण्यातही ज्येष्ठ आघाडीवर

विकतची लस घेण्यातही ज्येष्ठ आघाडीवर

Next

१५ शासकीय व आठ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणास प्रारंभ झाला आहे. या ठिकाणी काेविशिल्ड लस देण्यात येत आहे. जिल्ह्यात ८ मार्चपर्यंत एकूण २७ हजार ९९ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. यामध्ये २२ हजार ५३ जणांनी शासकीय रुग्णालयांमधून लस घेतली, तर ५०४६ जणांनी खासगी रुग्णालयांमध्ये शुल्क मोजून लस घेतली. खासगीमध्ये लस घेणऱ्यांमध्ये ३८२० जेष्ठ नागरिक असून, उर्वरित १२२६ जण इतर श्रेणीतील आहेत. कोरोना प्रतिबंधक लस घण्याचे कोणतेही दुष्परिणाम नसल्याबाबत जनजागृती केली जात असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा ओढा लस घेण्याकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे.

मी पहिल्याच दिवशी कोविशिल्ड लस घेतली. लस घेल्यानंतर मला कोणताही त्रास झाला नाही. किंचित हातपाय दुखलल्यासारखे वाटले, पण दुसऱ्या दिवशी कोणताही त्रास वाटला नाही. ६० पेक्षा अधिक वय असणाऱ्यांनी कोरोना लस घेतलीच पाहिजे.

दीपशिखा शेगोकार, अकोला

कोरोना लसीबाबत अनेक संभ्रम होते. लस घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी शंका निरसण केल्यानंतर खासगी ग्णालयात जाऊन लसीचा पहिला डोस घेतला. लस घेतल्यानंतर मला कोणताही त्रास झाला नाही. सर्वांनी ही लस घेतली पाहिजे.

निरंजन गवई, अकोला

सहव्याधीग्रस्तापेक्षा ज्येष्ठांचा उत्साह अधिक

एक मार्चपासून ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेले व इतर गंभीर आजार असलेल्यांसाठी लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. लसीकरणाबाबत ज्येष्ठांध्ये पहिल्या दिवसापासूनच उत्साह दिसून येत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये पेसे देऊनही लस घेण्यात ज्येष्ठ नागरिक आघाडीवर आहेत. ८ मार्चपर्यंत खासगीमध्ये लस घेतलेल्या एकूण ५०४६ लाभार्थींमध्ये ३८२० ज्येष्ठ नागरिक आहेत.

आतापर्यंत एकूण लस घेणारे २७०९९

शासकीयमध्ये २२०५३

खासगीमध्ये ५०४६

खासगीमध्ये वयोगट

ज्येष्ठ ३८३०

इतर १२२६

Web Title: Senior leader in buying vaccines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.