अकोला मनपात नियुक्त होण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नकारघंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:31 PM2018-08-01T12:31:04+5:302018-08-01T12:33:32+5:30
अकोला: महापालिकेत नियुक्त होण्यासाठी शासनाच्या वरिष्ठ अधिकाºयांची नकारघंटा कायम असल्यामुळे प्रशासकीय कारभार विस्कळीत झाला आहे.
अकोला:महापालिकेत नियुक्त होण्यासाठी शासनाच्या वरिष्ठ अधिकाºयांची नकारघंटा कायम असल्यामुळे प्रशासकीय कारभार विस्कळीत झाला आहे. त्याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होत असून, प्रशासकीय कामकाजाचा ताण एकट्या आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यावर येत असल्याचे चित्र आहे. मनपाची बिकट परिस्थिती पाहता पालक मंत्री डॉ. रणजित पाटील यांनी यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असता, प्रशासनाने इत्थंभूत अहवाल सादर केल्याची माहिती आहे.
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत एकहाती सत्ता असणाºया भाजपाच्या कार्यकाळात महापालिकेची अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. मनपातील वरिष्ठ अधिकाºयांची पदे रिक्त असल्यामुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले आहे. त्याचा गैरफायदा विकासात्मक कामांचा कंत्राट मिळवलेल्या कंत्राटदारांकडून घेतला जात आहे. आजरोजी मनपातील दोन्ही उपायुक्त पदे मागील आठ महिन्यांपासून रिक्त आहेत. मुख्य लेखा परीक्षक, शहर अभियंता आदी पदे रिक्त आहेत. यासंदर्भात महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी शासनाकडे वारंवार शिफारस पत्र सादर केल्यावरही शासन सकारात्मक निर्णय घेत नसल्याचे दिसून येत आहे. उपायुक्त पदांसाठी काही वरिष्ठ अधिकाºयांनी नकार दिल्याचे बोलल्या जात आहे. एकूणच चित्र पाहता भाजपाच्या कार्यकाळात महापालिकेची अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, यासाठी लोकप्रतिनिधी व पदाधिकाºयांनी शासनाकडे पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. मागील आठ महिन्यांपासून वरिष्ठ अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजाचा सर्व भार आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यावर येत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता नगर विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी प्रशासकीय समस्या व इतर मुद्यांवर सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
शहर अभियंता खान यांची बदली
महापालिकेचे शहर अभियंता इक्बाल खान यांची अमरावती जिल्ह्यात येथे पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या विभागीय कार्यकारी अभियंता पदावर बदली झाली आहे. त्यांचे पद रिक्त झाल्यामुळे जलप्रदायचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांच्याकडे शहर अभियंता पदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे.
मनपात दोन उपायुक्तांची पदे, मुख्य लेखा परीक्षक , शहर अभियंता आदींसह नगररचना विभागातील पदे रिक्त आहेत. यासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. पालकमंत्र्यांकडे सविस्तर अहवाल सादर करण्यात आला आहे.
-जितेंद्र वाघ, आयुक्त, मनपा