शिक्षकांसाठी वरिष्ठ, निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:31 PM2018-12-26T12:31:08+5:302018-12-26T12:31:23+5:30
अकोला: राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पूर्णवेळ शिक्षकांना त्यांच्या सेवेमध्ये वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी लागू करण्यासाठी सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत विद्या प्राधिकरणाच्यावतीने प्रशिक्षण राबविण्याचा निर्णय २१ डिसेंबर रोजी शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
अकोला: राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पूर्णवेळ शिक्षकांना त्यांच्या सेवेमध्ये वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी लागू करण्यासाठी सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत विद्या प्राधिकरणाच्यावतीने प्रशिक्षण राबविण्याचा निर्णय २१ डिसेंबर रोजी शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या प्रशिक्षणाचा शिक्षकांना सेवेमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून लाभ होणार आहे. हे प्रशिक्षण जिल्हा व विभाग स्तरावर शिक्षकांना देण्यात येणार आहे.
राज्यातील शंभर टक्के मुले शिकण्याच्या दृष्टिकोनातून शासनाच्या शिक्षण विभागामार्फत विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. जिल्हा परिषद, न.प., मनपा, खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालयांमधील पूर्णवेळ शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्यावतीने प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षकांना भाषा-मूलभूत क्षमता वाचन, गणित संबोध विकासन, तेजस प्रशिक्षण आणि माध्यमिक शिक्षकांना अविरत-१, सीएचईएसएस, आयआयटीचे गणित प्रशिक्षण, न्यासचे विज्ञान प्रशिक्षण देण्यात येणार आहे. २0१७-१८ पर्यंत ज्या शिक्षकांनी सेवांतर्गत प्रशिक्षण घेतले आहे आणि प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे, अशा शिक्षकांचे वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. यंदा बारा वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ श्रेणीसाठी दहा दिवसांचे प्रशिक्षण, २४ वर्षे पूर्ण केलेल्या शिक्षकांना निवडश्रेणीसाठी प्रत्येक वर्षी दहा दिवसांचे प्रशिक्षण याप्रमाणे चार वर्षांत ४0 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
सलग चार वर्षांत ४0 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करणाºया शिक्षकांना बारा वर्षांनंतर वरिष्ठ वेतनश्रेणी आणि २४ वर्षांनंतर निवडश्रेणी मिळते. हे प्रशिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता तर सुधारतेच, सोबतच शिक्षकांनासुद्धा आर्थिक लाभ मिळतो; परंतु त्यासाठी शासनाने काही अटी घातल्या आहेत. आॅनलाइन अर्ज करून पात्र ठरलेल्या शिक्षकांना प्रशिक्षण दिल्या जाते.
-डॉ. प्रकाश जाधव, प्राचार्य,
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था