ज्येष्ठांनी घ्यावा चौकस, ताजा व हलका आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:18 AM2021-04-10T04:18:57+5:302021-04-10T04:18:57+5:30
ठिकाणी बसून किंवा पडून न राहणे, शरीराची हलकी हालचाल ठेवणे आदी सल्ला डाॅक्टरांकडून देण्यात येत आहे. अनेक खाद्यपदार्थांचा ज्येष्ठांना ...
ठिकाणी बसून किंवा पडून न राहणे, शरीराची हलकी हालचाल ठेवणे आदी सल्ला डाॅक्टरांकडून देण्यात येत आहे. अनेक खाद्यपदार्थांचा ज्येष्ठांना त्यांच्या प्रकृतीनुसार त्रास होत असतो. त्यामुळे अशी पदार्थ नाकारलेलीच बरी, पचायला हलक्या पदार्थ्यांचा आहारात समावेश करावा, असे तज्ज्ञ सांगतात.
आहारतज्ज्ञ सांगतात...
दिवसाची सुरुवात गरम पाणी प्राशनाने करा.
पचायला हलके पदार्थ आहारात घ्या.
तळलेले, तिखट, आंबट, गोड, थंड पदार्थ टाळा.
हंगामी पालेभाज्या फळभाज्या, फळे आहारात घ्या.
नियमित व्यायाम करा.
सतत अंथरुणात झोपून न राहता दहा-पंधरा मिनिटे किंवा अर्धा तास शक्य होईल तो व्यायाम करावा. फिरणे, योगासने करण्यावर भर द्यावा. शरीराला शक्य होईल तेच व्यायाम करावे. ज्यांना डाॅक्टरांनी विशिष्ट व्यायामाचा सल्ला नाकारला असेल त्यांनी आराम करावा, असेही तज्ज्ञ सांगतात.
ताजे जेवण घ्या
ज्येष्ठ नागरिकांनी दिवसातून चार वेळा ताजे जेवण घेतले पाहिजे. आजारात हंगामी भाज्या आणि फळांचा समावेश असावा. रात्री झोपण्यापूर्वी कपभर हळदीचे दूध घ्यावे. इतर व्याधींनी ग्रस्त असणाऱ्यांनी डाॅक्टरांच्या सल्ल्याने आहार घ्यावा.