चिमुकल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास आजीवन कारावासाची शिक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 01:18 PM2019-02-22T13:18:00+5:302019-02-22T13:18:05+5:30
अकोला: घराजवळील सात वर्षीय चिमुकल्या मुलीला खाण्याच्या गोळ्या देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाºया नराधम आरोपीस प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एम.आय. आरलँड यांनी आजीवन कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अकोला: घराजवळील सात वर्षीय चिमुकल्या मुलीला खाण्याच्या गोळ्या देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाºया नराधम आरोपीस प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एम.आय. आरलँड यांनी आजीवन कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
पीडित मुलीच्या आईने २४ सप्टेंबर २0१३ रोजी जुने शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार शिवसेना वसाहतीमध्ये राहणारा आरोपी प्रदीप ऊर्फ गोलू सुरेश दांडगे (२५) याने सात वर्षीय चिमुकलीला खाण्याच्या गोळ्या देण्याचे आमिष दाखवून घरात बोलाविले आणि घराचे दार बंद करून तिच्या वयाचा विचार न करताना, शरीरसुखासाठी हपापलेल्या नराधम प्रदीप दांडगे याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि ही बाब कुणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकीही आरोपीने तिला दिली होती. मुलीला रक्तस्राव झाल्यामुळे मुलीच्या आईने तिला विचारल्यावर तिने हकिकत सांगितली. मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिल्यावर आरोपीविरुद्ध पोलिसांनी भादंवि कलम ३७६ (२) (आय), बालकांचे संरक्षण अधिनियम कायदा कलम ३(ए), ४ व कलम ५(एन), ६ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एम.आय. आरलँड यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने सात साक्षीदार तपासले. न्यायालयाने साक्ष व पुरावे ग्राह्य मानून आरोपी प्रदीप सुरेश दांडगे याला दोषी ठरविले आणि त्याला आजीवन कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगण्याचा आदेश दिला. तसेच महाराष्ट्र लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या व्यक्तीस नुकसानभरपाई अंतर्गत पीडित मुलीस ५ लाख रुपयांची मदत देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. पीडित मुलीची बाजू सहायक सरकारी विधिज्ञ मंगला पांडे यांनी मांडली. (प्रतिनिधी)