गुरुमाऊलींच्या पुण्यतिथी उत्सवाची भावपूर्ण सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:20 AM2021-07-27T04:20:16+5:302021-07-27T04:20:16+5:30
ह.भ.प. विष्णू महाराज गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञाानेश्वरी पारायण, गुरुचरित्राचे पारायण, प्रवचन कीर्तनादी कार्यक्रम उत्साहात पार पडले. पारायणपीठाचे नेतृत्त्व ह.भ.प.अनंत ...
ह.भ.प. विष्णू महाराज गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञाानेश्वरी पारायण, गुरुचरित्राचे पारायण, प्रवचन कीर्तनादी कार्यक्रम उत्साहात पार पडले. पारायणपीठाचे नेतृत्त्व ह.भ.प.अनंत महाराज आवारे यांनी केले. सप्ताहाअंतर्गत आषाढ शुद्ध दशमी पुण्यतिथीला वैकुंठगमणसमयी महाआरती व दीपोत्सव, आषाढी यात्रा उत्सव व गुरुपौर्णिमा उत्सवात गुरुमाऊलींचे भावपूर्ण पुण्यस्मरण करण्यात आले. श्रद्धासागर येथे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. श्रद्धासागर परिसरात ह.भ.प.गोपाळ महाराज उरळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करण्यात आले.
---------------------
‘गुरुभक्तीची ज्योत अखंड तेवत ठेवा!’
गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराजांनी समाजाचे हितासाठी देह कष्टविला. गुरुभक्तीची ज्योत अखंडपणे तेवत ठेवणे हीच खरी गुरुसेवा आहे. त्यादृष्टीने श्रद्धासागर येथे गुरुवर्यांना अभिप्रेत कार्य श्रद्धा व निष्ठेने पार पाडल्या जाते, अशा आशयाचे प्रतिपादन हभप ज्ञानेश प्रसाद पाटील यांनी केले. गुरुमाऊली पुण्यतिथी सप्ताहातील काल्याचे कीर्तनात ते बोलत होते.
--------------------------------
युवा सेनेच्या विधी सल्लागारपदी उमेश शिंदे
पातूर : शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना अध्यक्ष तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने युवासेना सचिव वरुण देसाई, यांच्या मार्गदर्शनात, जिल्हा प्रमुख तथा आमदार नितीन देशमुख, जिल्हाध्यक्ष युवासेना जितेश गुप्ता, युवासेना जिल्हा प्रमुख प्रा. दीपक बोचरे यांच्या नेतृत्वात शनिवारी अकोला येथे पार पडलेल्या कार्यक्रमात उमेश गजानन शिंदे यांची युवा सेना विधीविषयक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली.