गत वर्षीच्या तुलनेत यंदाचा सप्टेंबर दिलासादायक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:21 AM2021-09-26T04:21:19+5:302021-09-26T04:21:19+5:30

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर गत वर्षी सप्टेंबर महिना सर्वात घातक ठरला होता. सप्टेंबरच्या या ३० दिवसांत ३,४०३ रुग्णांचा अहवाल ...

This September is more comforting than last year! | गत वर्षीच्या तुलनेत यंदाचा सप्टेंबर दिलासादायक!

गत वर्षीच्या तुलनेत यंदाचा सप्टेंबर दिलासादायक!

Next

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर गत वर्षी सप्टेंबर महिना सर्वात घातक ठरला होता. सप्टेंबरच्या या ३० दिवसांत ३,४०३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह, तर ८३ जणांचा मृत्यू झाला होता. कोविडच्या पहिल्या लाटेतील हा सर्वात मोठा आकडा आहे. त्यानंतर नव्या वर्षात फेब्रुवारीमध्ये आलेल्या कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घालण्यास सुरुवात केली. ऑगस्ट महिन्यापासून कोविडची ही दुसरी लाटही ओसरू लागली. सप्टेंबर २०२१ मध्ये कोविडची दुसरी लाट पूर्णत: ओसरली असून, मागील २५ दिवसांत कोविडचे केवळ ३६ नवे रुग्ण आढळून आले. या कालावधीत एकाही रुग्णाला जीव गमवावा लागला नाही.

सप्टेंबरमध्ये कोरोनाचा आलेख

२०२० ची स्थिती

रूग्णसंख्या - १००८ - ९२२ - ८६७ - ६०६

मृत्यू - २० - २० - २३ - २०

दिवस - ९ सप्टेंबर - १६ सप्टेंबर -२३ सप्टेंबर - ३० सप्टेंबर

२०२१ ची स्थिती

रुग्णसंख्या - १४ - १४ - ८

मृत्यू - ० - ० - ०

दिवस - ९ सप्टेंबर - १६ सप्टेंबर -२३ सप्टेंबर

केवळ ३१ रुग्णच झाले बरे

सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ १९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. महिनाभरापासून हीच स्थिती कायम असून केवळ ३१ रुग्णांनाच डिस्चार्ज देण्यात आला आहे. गत वर्षी सप्टेंबर महिन्यात मात्र २४६९ जणांना डिस्चार्ज करण्यात आले होते. हे प्रमाण महिना भरात पॉझिटिव्ह आढळलेल्या एकूण रुग्णांच्या ७२ टक्के होते.

लसीकरणाचा सकारात्मक परिणाम

जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण माेहीम सुरू होऊन सुमारे ९ महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. या कालावधीत ८ लाखांपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले आहे. परिणामी नव्याने कोविड पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या घटली असून, रुग्णांमध्ये गंभीर स्वरुपाचे लक्षणेही दिसून येत नाहीत.

Web Title: This September is more comforting than last year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.