गणेश विसर्जनावेळी मधमाशांचा हल्ल्यात एक गंभीर, २0 जखमी

By admin | Published: September 16, 2016 03:16 AM2016-09-16T03:16:43+5:302016-09-16T03:16:43+5:30

खामगाव येथील घटना; जखमीमध्ये बालकांचा समावेश.

A seriously injured beekeeper was injured in Ganesh immersion, 20 injured | गणेश विसर्जनावेळी मधमाशांचा हल्ल्यात एक गंभीर, २0 जखमी

गणेश विसर्जनावेळी मधमाशांचा हल्ल्यात एक गंभीर, २0 जखमी

Next

खामगाव, (जि.बुलडाणा) : येथील आदर्श नगर भागातील गणेश मंडळाच्या गणपतीचे विहीगाव येथील मस नदीमध्ये विसर्जन करत असताना अचानक मधमाशांनी मंडळातील कार्यकर्त्यांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात मधमाशांनी २0 जणांना चावा घेतला असून एक जण गंभीर आहे.
मस नदीमध्ये श्रीगणेशाचे विसर्जन करत असताना अचानक मधमाशांचा हल्ला झाला. यात मिरवणुकीत सहभागी शिक्षक विनोद जाधव हे गंभीर आहेत. तर ग्रामसेवक संजय पाटील, भगवान लोड, गोपाळ मिर, नाना महाजन, संजय थेटे, शिक्षक आहाके, शैलेंद्र चव्हाण, तर अमर इधोळ, सिध्देश जाधव, सिमरन आहाके, लावण्या खराटे, सोमेश खराटे या बालकांनाही मधमाशांनाही चावा घेतला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या सर्वांना खामगाव येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title: A seriously injured beekeeper was injured in Ganesh immersion, 20 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.