सलग ५0 वर्षांपासून टायपिंगच्या माध्यमातून करतात सेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 10:08 AM2017-12-01T10:08:31+5:302017-12-01T10:12:07+5:30

अकोला बार असोसिएशन अकोला येथे गेल्या ५0 वर्षांपासून सलग  आपल्या उमेदीच्या काळापासून ते वयाची ८0 वर्ष ओलांडूनही टायपिंगच्या  माध्यमातून अविरत सेवा देणारे श्रीकृष्ण जनार्दन पुराडउपाध्ये आणि मनोहर  काशीनाथ रेलकर यांना अकोला बार टायपिस्ट असोसिएशनच्यावतीने  सोमवारी सन्मानित करण्यात आले.

Service through typing for 50 years in a row! | सलग ५0 वर्षांपासून टायपिंगच्या माध्यमातून करतात सेवा!

सलग ५0 वर्षांपासून टायपिंगच्या माध्यमातून करतात सेवा!

Next
ठळक मुद्देश्रीकृष्ण पुराडउपाध्ये, मनोहर रेलकर सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : अकोला बार असोसिएशन अकोला येथे गेल्या ५0 वर्षांपासून सलग  आपल्या उमेदीच्या काळापासून ते वयाची ८0 वर्ष ओलांडूनही टायपिंगच्या  माध्यमातून अविरत सेवा देणारे श्रीकृष्ण जनार्दन पुराडउपाध्ये आणि मनोहर  काशीनाथ रेलकर यांना अकोला बार टायपिस्ट असोसिएशनच्यावतीने  सोमवारी सन्मानित करण्यात आले.

पुराडउपाध्ये यांनी वयाची ८५ वी गाठली, तर रेलकर यांनी ८३ व्या वर्षात पदा र्पण केले. कोर्ट परिसरात अकोला बार असोसिएशनच्या सभागृहात मागील ४0  ते ५0 वर्षांपासून दोघेही सेवा देत आहेत. कोणाशीही वाद न घालता प्रामणिक पणे कार्य करू न आपल्या कार्याचा वेगळा ठसा त्यांनी उमटविला आहे.  अकोला बार असोसिएशनच्यावतीने देखील याआधी दोघांचाही सत्कार केला.  पुराडउपाध्ये यांनी ३१ ऑक्टोबर १९५९ ते ३१  ऑक्टोबर २0१७ पर्यंत सेवा  दिली. तसेच रेलकर यांनी २२ नोव्हेंबर १९९५ पासून अकोला बार  असोसिएशन सभागृहात टायपिंग सेवा देण्यास प्रारंभ केला.

बार टायपिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी राजेश परदेशी, नितीन दुरतकर,  शैलेंद्र पाठक, बिसमिल्ला, पंजाब वर, श्याम बामनकर, शर्मा, पाटील, आकाश  खडसे, एस.एस. काढोडे, सोनाली बोरीकर, वीसपुते, तेलगोटे-तायडे, कमरभाई, अजय वानखडे, हेमंत हिंगे, मुजाहिद, संजय इंगळे  यांच्या हस्ते पुराडउपाध्ये व रेलकर यांचा सन्मान करण्यात आला.

Web Title: Service through typing for 50 years in a row!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.