सेसफंडाच्या निधीची अकोट, तेल्हाऱ्यात खैरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 02:00 PM2019-03-01T14:00:21+5:302019-03-01T14:00:56+5:30

अकोला: गेल्या दोन वर्षांपासून सेसफंडाच्या ६ कोटी ५० लाख रुपये निधी वाटपाचा गुंता बांधकाम समितीच्या सभेत गोपनीयपणे २१३ कामांची यादी मंजूर करीत सोडविण्यात आला.

sesfund alocation; favour on akot and telhara taluka | सेसफंडाच्या निधीची अकोट, तेल्हाऱ्यात खैरात

सेसफंडाच्या निधीची अकोट, तेल्हाऱ्यात खैरात

Next


अकोला: गेल्या दोन वर्षांपासून सेसफंडाच्या ६ कोटी ५० लाख रुपये निधी वाटपाचा गुंता बांधकाम समितीच्या सभेत गोपनीयपणे २१३ कामांची यादी मंजूर करीत सोडविण्यात आला. त्यामध्ये समितीचे सभापती असलेले उपाध्यक्षांच्या हिवरखेड गटात सर्वाधिक म्हणजे ३६ लाख रुपये वाटप झाले. निधी वाटपाचा सर्वाधिक लाभ अकोट-तेल्हारा तालुक्यात झाला असून, त्यातून येत्या विधानसभा निवडणुकीवर डोळा असल्याचे संकेत आहेत. त्याचवेळी पातूर, मूर्तिजापूर तालुके वाºयावर सोडण्याचा प्रतापही बांधकाम समितीने केला आहे.
या वर्षात फेब्रुवारी अखेरपर्यंत बांधकाम विभागाचा खर्च केवळ १५ टक्के आहे. निधी खर्च करण्यासाठी घाईगडबडीत गेल्या काही दिवसांपासून सेसफंडातील कामाच्या गावांची यादी तयार झाली. त्या यादीला बांधकाम समितीच्या बुधवारी झालेल्या सभेत मंजुरी देण्यात आली. कामांची यादी पाहता ६ कोटी ५० लाखांचे जिल्ह्यातील पंचायत समितीनिहाय विषम वाटप झाल्याचे चित्र आहे.
त्यातच जिल्हा परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांनी गेल्या वर्षापासून टक्केवारीची रक्कम आधीच गोळा केली होती. त्यामुळे गोळा केलेल्या रकमेप्रमाणे काम वाटप करणे, बांधकाम समितीला भाग पडले. परिणामी, निधीचे वाटप विषमतेने झाले. निधी वाटपात सर्वाधिक रक्कम बांधकाम समिती सभापती, उपाध्यक्ष जमिरउल्लाखा पठाण यांच्या हिवरखेड गटात ३६ लाखांपेक्षाही अधिक रकमेची कामे देण्यात आली. काही गटांतील गावे निरंक ठेवण्यात आली आहेत.
- अकोट मतदारसंघावर डोळा
सेसफंडातून निधी वाटपात सर्वाधिक गावे अकोट, तेल्हारा तालुक्यातील आहेत. येत्या काळातील विधानसभा निवडणुकीत मतदारांसमोर जाण्यासाठी सेसफंडाचा फंडा वापरल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे. या दोन तालुक्यांत ५० टक्के कामे देण्यात आली. अकोटमध्ये ४७ तर तेल्हाºयात ४८ कामे आहेत. २१३ पैकी ९५ कामे या दोन तालुक्यात आहेत.
- तीन तालुक्यांत अत्यल्प वाटप
निधी वाटपात अन्याय झालेल्यांमध्ये तीन तालुके आहेत. त्यामध्ये बार्शीटाकळी- १९, मूर्तिजापूर- १४, पातूर- ४ अशी मिळून ३७ कामे आहेत. अकोला तालुक्यात ३४, बाळापूर तालुक्यात ३५ कामे देण्यात आली. त्यातही काही ठरावीक गावांची निवड करण्यात आली. त्यामुळे अनेक जिल्हा परिषद, पदाधिकाºयांचा असंतोष २ मार्च रोजीच्या सर्वसाधारण सभेत उफाळून येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

Web Title: sesfund alocation; favour on akot and telhara taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.