दुष्काळ गाजविणार अधिवेशन!
By Admin | Published: December 8, 2014 01:19 AM2014-12-08T01:19:09+5:302014-12-08T01:19:09+5:30
विरोधकांसह सत्ताधारी आमदारही करणार दुष्काळ जाहीर करण्याची मागणी.
विवेक चांदूरकर / अकोला
यावर्षी वर्हाडात पावसाच्या अवकृपेमुळे खरीप अन् रब्बी हंगाम हातचा गेल्याने शेतकर्यांना पाणीटंचाई, चाराटंचाई व नापिकी अशा तिहेरी संकटांचा सामना करावा लागत आहे. नागपूर ये थे सोमवार, ८ डिसेंबरपासून सुरू होणार्या अधिवेशनात वर्हाडात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधी आमदारांसह सत्ताधारी आमदारही करणार आहेत. वर्हाडातील तीनही जिल्ह्यां तील १५ आमदारांचा भर दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना मदत मिळवून देण्यावरच राहणार आहे.
शेतकर्यांच्या ओढवलेल्या संकटामुळे शेती व्यवसाय तर मोडकळीस आलाच, बाजारपेठही मंदावली आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक प्रभावित झाले आहेत. परिणामी शेतकर्यांना अनुदान द्या, त्यांना मदत करा, हीच मागणी आमदारांकडून या अधिवेशनात केली जाणार आहे. अकोला जिल्ह्यातील आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, हरीश पिंपळे, प्रकाश भारसाकळे, बळीराम सिरस्कार, वाशिमचे राजेंद्र पाटणी, लखन मलिक यांनी या अधिवेशनात शेतकर्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठीच्या प्रश्नाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. काँग्रेसचे रिसोड येथील आमदार अमित झनक व बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनीही दुष्काळ हाच अधिवेशनातील आपला महत्त्वाचा मुद्दा असल्याचे सांगि तले. आ. सपकाळ यांनी यावर्षी दुष्काळ तर जाहीर करा, सोबतच कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.
*दुष्काळासोबतच स्थानिक प्रश्नही मांडणार
वर्हाडातील दुष्काळासोबतच मतदारसंघातील प्रश्नही आमदार मांडणार आहेत. आ. बळीराम सिरस्कार हे एमआयडीसीचा प्रलंबित प्रश्न निकाली निघावा, आ. रणधीर सावरकर हे पाणी पुरवठा योजना, तर रिसोडचे आमदार अमित झनक हे वाशिम जिल्ह्यातील आरोग्य खात्यात रिक्त असलेल्या पदांचा प्रश्न मांडणार आहेत.
*वर्हाडातील विरोधक आमदार दोनच
अकोला, वाशिम, बुलडाणा या तीन जिल्ह्यात पंधरा आमदार आहेत. यापैकी केवळ चार आमदार काँग्रेस व अन्य पक्षाचे आहेत तर ११ आमदार हे सत्ताधारी पक्षाचे आहेत. या चार आमदारांपैकी बाळापूरचे भारिप-बहुजन महासंघाचे आमदार बळीराम सिरस्कार सत्ताधार्यांसोबत आहेत. चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे निलंबित झाले आहेत. त्यामुळे केवळ रिसोडचे आमदार अमित झनक व बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ हे दोघेच विरोधक राहणार आहेत.
*हेक्टरी २५ हजार मदतीची मागणी
यावर्षी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात नुकसानच झाल्यामुळे शेतकर्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आमदारांनी दुष्काळ जाहीर करण्यासोबत शेतकर्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत मिळावी, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे सांगितले आहे.