‘रक्त तपासणीचे दर निश्चित करा!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:18 AM2021-04-25T04:18:01+5:302021-04-25T04:18:01+5:30
पातूर : जिल्ह्यांमध्ये खासगी पॅथाॅलाॅजी लॅबोरेटरीमध्ये रक्त व इतर तपासणींचे दर निश्चित करण्याची मागणी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी ...
पातूर : जिल्ह्यांमध्ये खासगी पॅथाॅलाॅजी लॅबोरेटरीमध्ये रक्त व इतर तपासणींचे दर निश्चित करण्याची मागणी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
माजी आमदार सिरस्कार यांनी दिलेल्या निवेदनानुसार, जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच वातावरणातील बदलांमुळे साथीचे आजार वाढले आहेत. याचे निदान करण्यासाठी रुग्णांची आरोग्य स्थिती जाणून घेण्यासाठी डॉक्टर रक्त व लघवीची चाचणी करण्यास सांगतात. त्याकरिता खासगी पॅथॉलाॅजी लॅबोरेटरीमध्ये जाऊन चाचणी केली जाते; मात्र ही चाचणी करताना रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा दर वसूल करून आर्थिक लूट सुरू आहे. जिल्ह्यातील खासगी पॅथॉलॉजी मालकांची मनमानीला आळा घालून तपासणींचे दर निश्चित करण्याची मागणी बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.