‘एटीएम’चा ठणठणाट कायम

By admin | Published: May 6, 2017 07:46 PM2017-05-06T19:46:33+5:302017-05-06T19:46:33+5:30

शहरास जिल्हय़ातील बहुतांश सर्वच राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या एटीएममधील पैशांचा ठणठणाट कायमच आहे.

The settlement of the ATM was fixed | ‘एटीएम’चा ठणठणाट कायम

‘एटीएम’चा ठणठणाट कायम

Next

बहुतांश एटीएममध्ये पैसेच नाहीत : पैशांसाठी नागरिकांची पायपीट
अकोला: गत काही दिवसांपासून सुरू असलेली रोखतेची समस्या अजूनही मार्गी न लागल्यामुळे काही अपवाद वगळता शहरास जिल्हय़ातील बहुतांश सर्वच राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या एटीएममधील पैशांचा ठणठणाट कायमच आहे. खात्यांमध्ये पैसे असतानाही एटीएममधून पैसे मिळत नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
शहरासह जिल्हय़ात विविध राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांची ५00 वर एटीएम आहेत. नोव्हेंबर महिन्यात केंद्र शासनाने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर सर्वच एटीएम बंद पडले होते. त्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊन सर्वच एटीएम सुरू होऊन पैशांची चणचणही राहिली नाही; परंतु गेल्या काही दिवसांपासून शहरातील राष्ट्रीयीकृत व खासगी एटीएममध्ये पैशांची प्रचंड चणचण आहे. रिझर्व्ह बँकेकडून जिल्हय़ाच्या मागणीनुसार पुरेशा प्रमाणात रोकड मिळत नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे बँकांच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. सध्या शहरातील बहुतांश एटीएममध्ये ठणठणाट आहे. काही एटीएम मशीन सुरू राहत असल्या, तरी त्यात नोटा नसल्याने नागरिकांना आल्या पावली मागे फिरावे लागत आहे. टॉवर चौकातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील ह्यएटीएमह्ण व खासगी बँकेच्या एक ते दोन एटीएमचा अपवाद वगळता शहरातील बहुतांश एटीएममध्ये दररोजच ठणठणाट पाहावयास मिळत आहे.

काही मिनिटांमध्येच संपतात पैसे
शहरात असलेल्या एटीएममध्ये बँकांकडून ठरावीक रक्कम ह्यलोडह्ण करण्यात येते; परंतु मागणी जास्त असल्यामुळे एखाद्या एटीएमवर नागरिकांची गर्दी झाली की अवघ्या काही मिनिटांमध्येच एटीएममधील रक्कम संपुष्टात येते. त्यामुळे रांगेत असलेल्या नागरिकांना हिरमुसले होऊन मागे फिरावे लागत असल्याचे चित्र अनेक एटीएम केंद्रांवर दिसून येत आहे.

बँकांमध्ये वाढली गर्दी
एटीएममधून पैसे मिळत नसल्याने नागरिकांना नाइलाजाने बँकांमध्ये जावे लागत आहे. यामुळे बँकांमध्ये प्रचंड गर्दी होत असून, नागरिकांच्या रांगा लागत आहेत. बँकांमधील गर्दी नको म्हणून लोक एटीएममधून पैसे काढण्यास प्राधान्य देतात; परंतु एटीएममध्ये ठणठणाट असल्याने तेथेही निराशाच पदरी पडत आहे.

पैसे आहेत; पण काढता येत नाही!
बँक खात्यांमध्ये पैसे आहेत; परंतु एटीएममध्ये ठणठणाट असल्याने आपलाच पैसे आपल्या उपयोगी पडत नसल्याच्या भावना नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे. पैसे मिळेल या आशेने नागरिक या एटीएममधून त्या एटीएमपर्यंत पायपीट करत असल्याचे चित्र शहरात आहे.

Web Title: The settlement of the ATM was fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.